Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : पुणे जिल्ह्यात बंदोबस्ताला सीआयएसएफ, कर्नाटक पोलिस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व कर्नाटक पोलिसांच्या सशस्त्र तुकड्या तैनात राहतील. ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाचे मतदान सात मे रोजी होणार आहे. पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच मतदान केंद्रांच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बारामती व शिरूर मतदारसंघातील काही भाग पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत येतो.

बंदोबस्तास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि कर्नाटक पोलिसांच्या आठ तुकड्या तैनात राहतील. मावळ मतदारसंघातील २१८ मतदान केंद्रांच्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मावळचा काही भाग रायगड पोलिसांच्या अखत्यारीत येतो. बारामती मतदारसंघात एक हजार ८०५ मतदान केंद्रे आहेत. शिरूर मतदारसंघात एक हजार १३७ मतदान केंद्र आहेत, अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

१८ मतदान केंद्रे संवेदनशील...

जिल्ह्यात १८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यापैकी सहा मतदान केंद्रे बारामती मतदारसंघात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात आठ संवेदनशील केंद्रे आहेत. त्यापैकी एक केंद्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत आहे. उर्वरित रायगड पोलिसांच्या अखत्यारीत आहेत. मुळशीत दोन आणि इंदापुरात एक मतदान केंद्र संवेदनशील आहे. शिरूर मतदारसंघातील आंबेगाव येथे एक मतदान केंद्र संवेदनशील आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT