Lok Sabha election 2024  Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

‘‘गेल्या काही काळात आम्ही तिसऱ्यांदा निवडणूक आयोगात आलो आहोत. टपालाने आलेली मते ही निकालात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करीत असताना सर्वप्रथम टपालाने आलेल्या मतांची (पोस्टल बॅलेट्स) मोजणी केली जावी,’’ अशी मागणी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी रविवारी निवडणूक आयोगाकडे केली. आघाडीच्या एका शिष्टमंडळाने यासंदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली.

‘‘गेल्या काही काळात आम्ही तिसऱ्यांदा निवडणूक आयोगात आलो आहोत. टपालाने आलेली मते ही निकालात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे ‘पोस्टल बॅलेट’ची सर्वप्रथम मोजणी केली जावी, हा निवडणूक आयोगाचा नियम होता.

त्यामुळे चार तारखेला निकालादरम्यान या मतांची आधी मोजणी केली जावी,’’ अशी मागणी करण्यात आल्याचे काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. कडक देखरेखीखाली मतमोजणी करावी, असा मुद्दा आयोगासमोर मांडण्यात आला असल्याचे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांना नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Success Story: जिद्द, मेहनत आणि धाडसी निर्णय; यूपीएससी आयएफएस परीक्षेत अभिषेक कत्ते यशस्वी, देशसेवेची ओढ ठरली यशाची गुरुकिल्ली..

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

सहा महिन्यात विजय यांचं सरकार कोसळणार, स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री होणार; आमदाराचा मोठा दावा? राजकारण तापलं

Leopard Attack: गंगापूर तालुक्यात बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्याच्या वासराला ठार केल्याने भीतीचे वातावरण, शेतकरी हवालदिल..

Parbhani News: परभणीत एसटी बसला दीड किलोमीटरचा फेरा वाहतूक कोंडीवर उपाय नाही, उलट प्रवाशांचा वेळ - इंधन वाया

SCROLL FOR NEXT