Abdul Rehman esakal
लोकसभा २०२४

Dhule Lok Sabha Constituency : अब्दुल रेहेमान यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी; मत विभाजनाचा प्रश्‍न

Dhule News : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, माजी सनदी पोलिस अधिकारी अब्दुल रेहेमान यांच्या एका याचिकेवर सोमवारी (ता. २९) सुनावणी आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, माजी सनदी पोलिस अधिकारी अब्दुल रेहेमान यांच्या एका याचिकेवर सोमवारी (ता. २९) सुनावणी आहे. त्या वेळी निकालाची शक्यताही असेल. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रेहेमान लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील रिंगणात असावे, यासाठी भाजपकडून गणपती पाण्यात ठेवला गेल्याची चर्चा आहे. (Dhule Lok Sabha Constituency)

तसे झाल्यास मत विभाजनाचा फटका काँग्रेसला बसण्याची अधिक शक्यता असेल. त्यामुळे याचिकेच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रेहेमान हे धुळे जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक आहेत. राज्य मानवाधिकार आयोगाचे ते महानिरीक्षक होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केला.

तो स्वीकारला नाही. मात्र केंद्र सरकारने २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणल्यावर रेहेमान यांनी राजीनामा दिला. तोही स्वीकारण्यास सरकारने नकार दिला. या निर्णयाविरोधात रेहेमान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. यासंदर्भात निकालावर वंचित बहुजन आघाडी आणि रेहेमान यांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. (Latest Marathi News)

वाट पाहावी लागेल लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीने असावे, अशी भाजपची मनोमनी इच्छा आहे. त्याचे कारण वंचित बहुजन आघाडीमुळे मतदारसंघात मत विभाजनाला वाव आहे. प्रामुख्याने मालेगाव, धुळे, सोनगीर, दोंडाईचासह अन्य ठिकाणच्या मुस्लिम बहुल भागावर काँग्रेसची बरीच भिस्त आहे.

या भागातून मिळणारे एकगठ्ठा मतदान पारड्यात पडावे, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात राहिल्यास काँग्रेसचे पारंपरिक मुस्लिम आणि दलित समाजातील मतदार काँग्रेसपासून दुरावतील. काँग्रेसच्या पारंपरिक मतांची वजावट होईल. अशा मत विभाजनाचा काँग्रेसला फटका आणि भाजपला ते लाभदायी ठरू शकेल, असा होरा राजकीय जाणकारांकडून व्यक्त होताना दिसतो.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडी रिंगणात राहिल्यास ते आपल्या पथ्यावर पडेल, असे भाजपला वाटते. त्यासाठी भाजपने गणपती पाण्यात ठेवल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. परंतु वंचित आघाडीचे धुळे मतदारसंघातील उमेदवारीसंदर्भात भवितव्य काय असेल, यासाठी सोमवारची वाट पाहावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT