Shirur Loksabha  sakal
लोकसभा २०२४

Shirur Loksabha : डॉ. अमोल कोल्हे यांचा अर्ज वैध ; पुणे ४२, शिरूर ३५ अन् मावळ मतदारसंघातून ३५ उमेदवार रिंगणात

पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. यादरम्यान शिरूरमधील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेण्यात आला होता; मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार निकाली काढत अर्ज वैध ठरविला.

पुण्यातून सर्व ४२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. शिरूरमधून ११ उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांनी बाद झाले. शिरूरमधून ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अपक्ष ११ उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव अवैध ठरविले. त्यामुळे ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. पुणे मतदारसंघातून केवळ मोनिका मुरलीधर मोहोळ यांचा एक अर्ज पक्षाचा एबी फॉर्म न जोडल्याने बाद झाला. त्यांचा उर्वरित अर्ज अपक्ष म्हणून कायम राहिला आहे. त्यामुळे पुण्यातून ४२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

मावळ मतदारसंघातून ३८ जणांनी ५० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात ३५ उमेदवारांचे ४६ अर्ज वैध ठरले असून तीन जणांचे चार अर्ज अवैध ठरले. या तिन्ही मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सोमवारी (ता. २९) दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. त्यानंतर तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होणार आहे.

डॉ. कोल्हेंचा अर्ज वैध...

डॉ. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जाबरोबर जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती नोंदविलेली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती. तक्रार अर्जात डॉ. कोल्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे नमूद आहे, तसेच अर्जासमवेत जोडलेल्या नोटीसमध्ये केवळ नावाचा उल्लेख असून पत्ता नमूद नाही. त्यामुळे ही व्यक्ती डॉ. कोल्हे हेच आहेत याचा बोध होत नाही, असे सांगून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार निकाली काढत अर्ज वैध ठरविला.

गुन्ह्यांची कोणतीही कल्पना नव्हती. पोलिसांकडून नोटीसही दिली नव्हती. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतानाही पुणे पोलिसांनी गुन्ह्यांची माहिती दिली नाही. सन २०१६ मध्ये पुण्यात होणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेला विरोध केला होता. त्यामुळे गुन्हा दाखल झाला होता.

- डॉ. अमोल कोल्हे, उमेदवार, राष्ट्रवादी कॉँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Content Creator Earning: ₹60 हजारांच्या नोकरीला बाय-बाय! फक्त 14 हजार फॉलोअर्सवर महिन्याला कमावते ₹1.12 लाख

दुरुस्तीवेळी अचानक सुरू झाला बॉयलर, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुरक्षा साधनांच्या अभावामुळे दुर्घटनेचा नातेवाईकांचा आरोप

डोंबिवली सोडली, जिद्दीने गोरेगावला घेतलेलं घर; आता तेजश्री प्रधानवर आली तोही फ्लॅट सोडायची वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात; खासदारांचा विरोध, पोलिसांच्या बससमोर ठिय्या

Thane News: पाण्यासाठी मुंबईकडे धाव! ठाणे पालिकेकडून पिसे बंधाऱ्यातील ५० एमएलडीची मागणी

SCROLL FOR NEXT