Hatkanangale Lok Sabha MLA Prakash Awade esakal
लोकसभा २०२४

Hatkanangale Lok Sabha : आमदार आवाडेंच्या बंडखोरीमागे नेमका कोणाचा हात? राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत

आवाडे यांनी २०१९ ची विधानसभा जिंकल्यानंतर न मागता भाजपला पाठिंबा दिला.

सकाळ डिजिटल टीम

आवाडे यांना भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करायचा आहे; पण स्थानिक पातळीवर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यामुळे त्यांचा हा पक्ष प्रवेश रखडल्याचे बोलले जाते.

कोल्हापूर : पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्‍या (Congress) जिल्‍हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अपक्ष आमदार झालेले व नंतर भाजपचे (BJP) सहयोगी सदस्य राहिलेल्या प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांच्या बंडखोरीमागे नेमका कोणाचा हात आहे?, असा प्रश्‍न जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला पडला आहे. आवाडे यांनी हबकी डाव टाकून भविष्यातील तडजोडीसाठी तरी हा इशारा दिला नसेल ना? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आवाडे यांनी २०१९ ची विधानसभा जिंकल्यानंतर न मागता भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य राहिले. त्यातही उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत. लोकसभेच्या हातकणंगले (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारील गेल्या महिन्याभरापासून आवाडे व त्यांच्या कुटुंबीयांकडून उघड विरोध केला जात आहे.

आवाडे यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी सुरुवातीला स्वतःच लोकसभा लढणार, अशी घोषणा केली. त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढण्याची तयारीही दर्शवली होती. पण, तत्पूर्वीच माने यांची महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राहुल हे शांत झाले होते. मात्र, अंतर्गत त्यांचा माने यांना असलेला विरोध कायम होता. दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन राहुल आवाडे यांनीच आमदार प्रकाश आवाडे हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरण्याची घोषणा त्यांनी केली. कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी सहकुटुंब भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राहुल आवाडे, त्यांच्या पत्नी मौसमी उपस्थित होत्या. बंद खोलीतील या चर्चेनंतरही आवाडे हे लढण्यावर ठाम आहेत. एवढेच नव्हे, तर ते मंगळवारी (ता. १६) अर्जही भरणार आहेत. त्यांचे हे धाडस पाहता, त्यांच्या मागे भाजपचीच ताकद तर नाही ना? असा प्रश्‍न पडत आहे.

...तर गणित बिघडणार

आवाडे यांना भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करायचा आहे; पण स्थानिक पातळीवर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यामुळे त्यांचा हा पक्ष प्रवेश रखडल्याचे बोलले जाते. त्यातूनच त्यांनी थेट लोकसभेला भाजपलाच आव्हान दिले असल्याचे बोलले जाते. आवाडे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास या मतदारसंघाचे राजकीय गणित बिघडणार आहे, त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT