Hema Malini Sakal
लोकसभा २०२४

Hema Malini : मी कृष्णभक्त, राजकीय नेता नाही; हेमामालिनी कामे पूर्ण करण्यासाठीच पुन्हा रिंगणात

‘‘मागील काही वर्षांपासून राजकारणात असले तरी मी राजकीय नेता नाही. मी कृष्णभक्त आहे आणि मथुरेच्या विकासाबाबत मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे,’’ असे प्रतिपादन मथुरा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार हेमामालिनी यांनी आज केले.

सकाळ वृत्तसेवा

वृंदावन : ‘‘मागील काही वर्षांपासून राजकारणात असले तरी मी राजकीय नेता नाही. मी कृष्णभक्त आहे आणि मथुरेच्या विकासाबाबत मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे,’’ असे प्रतिपादन मथुरा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार हेमामालिनी यांनी आज केले.

ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी या मथुरा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दोन वेळेस विजयी झाल्या असून यंदा त्या तिसऱ्यांदा निवडणूक लढविणार आहेत. मथुरेत लोकांमध्ये हेमामालिनी यांच्याबद्दल आकर्षण आहे. या आकर्षणाचे मतांमध्ये रूपांतर होते की नाही, त्यावर हेमामालिनी यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विजयाबद्दल विश्‍वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या,‘‘तिसऱ्यांदा निवडणूक लढवीत असले तरी मी राजकारणी नाही. मी स्वत:ला कृष्णभक्त मानते व माझ्या मतदारसंघात अद्याप अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठीच मी पुन्हा निवडणूक लढवीत आहे. मथुरा मतदारसंघ माझ्याकडे नसता, तर कदाचित मी निवडणूक लढविली नसती. श्रीकृष्णाला माझ्याकडून सेवा करवून घ्यायची असल्यानेच मी येथे आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT