Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी बिहारमध्ये ‘जेडीयू’चे उमेदवार जाहीर ; दोन विद्यमान खासदारांना डच्चू

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘जेडीयू’ने रविवारी (ता. २४) लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील १६ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले.

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘जेडीयू’ने रविवारी (ता. २४) लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील १६ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. यात दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कापण्यात आला असून, काही दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या दोन उमेदवारांना लोकसभेचे तिकीट जाहीर केले.

पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा केली. ज्या जागांवर विद्यमान खासदार वगळण्यात आले आहेत, त्या सीमामढीच्या लोकसभा मतदारसंघात विधान परिषदेचे अध्यक्ष देवेशचंद्र ठाकूर हे ‘जेडीयू’चे उमेदवार असतील आणि सिवान येथील जागेवर विजयलक्ष्मी कुशवाह यांना रमेशसिंह यांच्यासह पक्षात प्रवेश केल्यावर लगेचच तिकीट मिळाले.

कुशवाह हे ‘एनडीए’चे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. पक्षाचे तिकीट मिळालेले आणखी एक दुसऱ्या पक्षातून आलेले उमेदवार म्हणजे लवली आनंद, ज्यांनी महिन्याच्या सुरवातीला ‘जेडीयू’मध्ये सामील होण्यासाठी आरजेडी पक्ष सोडला होता. त्या शेओहरमधून निवडणूक लढवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT