Kanhaiya Kumar contest from North East Delhi congres new list lok sabha election Sakal
लोकसभा २०२४

Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांना ईशान्य दिल्लीतून संधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ईशान्य दिल्लीतून युवा नेते कन्हैया कुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ईशान्य दिल्लीतून युवा नेते कन्हैया कुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. चांदणी चौक मतदारसंघामधून जे. पी. अगरवाल, तर वायव्य दिल्लीतून उदित राज यांना तिकीट देण्यात आले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना जालंधर मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आले आहे.

काँग्रेसने रविवारी रात्री १० उमेदवारांची यादी जाहीर केली. दिल्लीत पक्ष तीन जागांवर निवडणूक लढविणार असून, तिन्ही जागांवरील उमेदवार आज घोषित करण्यात आले. पंजाबमधील अमृतसरमध्ये गुरजितसिंग औजला, जालंधरमध्ये चरणजितसिंग चन्नी, फतेहगड साहिब मतदारसंघात अमरसिंह,

भटिंडामध्ये जीत मनोहरसिंग सिद्धू, संगरूर मतदारसंघात सुखपालसिंग खैरा तसेच पतियाळा मतदारसंघात धर्मवीर गांधी यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मतदारसंघात पक्षाने उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना तिकीट दिले आहे. दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत. गतवेळी या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis on cabinet subcommittee : मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा! मंत्रिमंडळ उपसमितीचं फडणवीसांकडून विशेष कौतुक, म्हणाले...

KCR News : केसीआर यांनी स्वत:च्या मुलीची पक्षातून केली हाकालपट्टी; BRS मधील अंतर्गत वादाला नवे वळण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनानंतर शिरूरमध्ये जल्लोष, गुलाल उधळून साजरा

Ajit Pawar : करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखलंच नाही; दादांचा संताप, VIDEO VIRAL

Pune News : पुण्यात पुराचा धोका वाढला; नदीची वहन क्षमता घटल्याने ४०% वाढ

SCROLL FOR NEXT