Mamata Banerjee
Mamata Banerjee sakal
लोकसभा २०२४

Mamata Banerjee : बंगालमध्ये 26/11 सारख्या हल्ल्याचा प्लॅन, अभिषेक बॅनर्जींच्या घराबाहेर रेकी करणारा संशयित अटकेत

संतोष कानडे

Loksabha election 2024 : कोलकाला पोलिसांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या घराबाहेरुन रेकी करण्याच्या आरोपाखाली एकाला ताब्यात घेतलं आहे. कोलकाता पोलिसांनी सदरील व्यक्तीला मुंबईतल्या माहिम भागातून ताब्यात घेतलं आहे. या इसमाचं नाव राजाराम रेगे असल्याचं सांगितलं जात आहे. कोलकाता पोलिसांनी सांगितलं की, राजारामचं कनेक्शन मुंबई हल्ल्यातील हँडलर डेव्हीड हेडलीसोबत आहे.

एवढंच नाही तर कोलकाता पोलिसांनी दावा केला की, राजाराम हा कोलकातामध्ये मुंबईतल्या २६/११ हल्ल्याप्रमाणे हल्ला करण्याचा कट रचत होता. कोलकाता पोलिसांनी राजारामला अशावेळी अटक केली जेव्हा एक दिवस अगोदरच ममता बॅनर्जी यांनी आपली आणि आपल्या पुतण्याची हत्या होऊ शकते, असं विधान केलं होतं.

कोलकाता पोलिस विभागातील अतिरिक्त पोलिस कमिश्नर मुरलीधर शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, कोलकाता पोलिसांनी टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करण्याच्या प्रकरणात मुंबईतून राजाराम रेगेला ताब्यात घेतलं आहे. राजारामने २०११च्या मुंबई हल्ल्ल्याच्या पूर्वीच डेव्हीड हेडलीसोबत संपर्क साधला होता.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, दहशतवादी हेडलीने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील फिर्यादी साक्षीदार म्हणून शिकागो न्यायालयात दिलेल्या जबाबात म्हटले होते की, त्याने मध्य मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात जाऊन राजाराम रेगे याची भेट घेतली होती.

अतिरिक्त सीपींनी सांगितले की, राजारामला कोलकातामध्ये पाहिलं होतं. त्याने दक्षिण कोलकाता येथे हॉटेल घेतले होते. एवढेच नाही तर त्याच्याकडे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पीएचा नंबर होता. कोलकाता पोलिसांचे म्हणणे आहे की 26/11 सारख्या हल्ल्याची योजना आखली जात होती. आरोपींनी अभिषेक बॅनर्जी यांचे घरही फोडण्याचा प्रयत्न केला होता. राजाराम कोलकाता येथे आणखी काही लोकांना भेटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

रविवारी ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःसह पुतण्याची हत्या होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी २० मिनिटांच्या भाषणानंतर एक शेर म्हणत मोठा दावा केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बॉम्बस्फोटाच्या गोष्टी होत आहेत.. मी आणि अभिषेक टार्गेटवर आहोत. हे लोक आमचा जीव घेऊ शकतात. असं म्हणत ममतांनी एक शेर म्हटला, रहा गुलशन तो फुल खिलेंगे, रही जिंदगी तो फिर मिलेंगे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT