NCP Manifesto: यशवंतरावांना भारतरत्न, मराठी भाषा, परराष्ट्र धोरण... राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात अजित पवारांची कोणती आश्वासने?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आज मुंबईतील पक्ष कार्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी जाहिरनाम्याची घोषणा केली.
NCP Lok Sabha election 2024 Manifesto
NCP Lok Sabha election 2024 ManifestoEsakal
Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला.

राष्ट्रवादीने आपल्या जाहिरनाम्यात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा यासाठी पुढाकार घेणे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणे आणि परराष्ट्र धोरणाला प्राधान्य देणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच आपले काका शरद पवार यांना आव्हान देत आहे. त्यामुळे काक-पुतण्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात 'सबका साथ, सबका विकास' मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

NCP Lok Sabha election 2024 Manifesto
Sharad Pawar: 'मला माफ करा, मी ती चूक सुधारण्यासाठी...' अमरावतीत शरद पवार असे का म्हणाले?

दरम्यान माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना आपले गुरू मानले आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा म्हणून मोलाची भूमिका बाजवू असे आपल्या जाहिरनाम्यात सांगितले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. आता यासाठी राष्ट्रावादीने प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात म्हटले आहे.

राष्ट्रवादीने आपल्या जाहिरनाम्यात राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणालाही महत्त दिले आहे. जाहिरनाम्यात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी पक्षाची भूमिका आहे.

NCP Lok Sabha election 2024 Manifesto
Nashik Lok Sabha Constituency 2024 : एक टक्क्यांपेक्षा कमी मतदानाचे 17 जण धनी; डिपॉझिटही जप्त

राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यातील प्रमुख मुद्दे

80 कोटी नागरिकांना मोफत रेशन.

चार कोटी लोकांना कायमस्वरूपी घरे.

मुद्रा योजनेचा 46 कोटी लोकांना लाभ.

पीएम सूर्यघर योजनेतून मोफत वीज.

शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे.

महाराष्ट्राला कौशल्य विकासाचे केंद्र बनवणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz
Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics
Congress Faces NCP Protest in Pune After Alleged Offensive Statement on Deputy Chief Minister Sunetra Pawar
NCP workers staged a protest in Baramati against former Chief Minister Prithviraj Chavan's remarks on Deputy Chief Minister Sunetra Pawar, calling the comments inappropriate and disrespectful to women leaders.
Marathi News Esakal
www.esakal.com