Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : स्टार प्रचारकांची फौज दिल्लीत;२५ मे रोजी मतदान; मोदी, नड्डा, खर्गे, राहुल, प्रियांका घेणार सभा

दिल्लीतील प्रचार संपायला केवळ दोन दिवस राहिलेले असताना भाजप व काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची फौज दिल्लीत दाखल झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रचार संपायला केवळ दोन दिवस राहिलेले असताना भाजप व काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची फौज दिल्लीत दाखल झाली आहे. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, तर काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सचिन पायलट प्रचारात उतरलेले आहेत.

दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघात २५ मे रोजी मतदान होणार आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने या सातही जागांवर प्रभुत्व कायम राखले आहे. यावेळी काँग्रेस व आपमध्ये आघाडी झाल्याने आप चार तर काँग्रेस तीन जागांवर लढत देत आहे. काँग्रेस व आपची आघाडी झाल्याने भाजपपुढे काहीसे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेतली. पंतप्रधानांनी पहिल्यांदाच या मतदारसंघात प्रचार सभा घेतली आहे.

या मतदारसंघातून भोजपुरी गायक मनोज तिवारी निवडणूक लढवीत असून त्यांच्या विरोधात काँग्रेसने विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार यांना मैदानात उतरविले आहे. याशिवाय भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचप्रमाणे भाजपशासित मुख्यमंत्र्यांना दिल्लीत प्रचार करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. यामुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिल्लीच्या प्रचारात उतरले आहेत. काँग्रेसचे तीनच उमेदवार मैदानात असल्याने काँग्रेस उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार घेण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.

खासदार स्वाती मालीवाल प्रकरणामुळे काँग्रेस व आपमध्ये काहीसा तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे संयुक्त रोड शो अद्यापही आयोजित केलेले नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा उत्तर-पश्चिम या लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा उद्या, २२ मे रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रोड शो येत्या गुरुवारला उत्तर-पूर्व मतदारसंघात आयोजित केला आहे. पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा रोड शो होणार आहे. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे दिल्लीतील प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

‘आप’पासून काँग्रेस दूर

खासदार स्वाती मालीवाल प्रकरणामुळे काँग्रेसने ‘आप’च्या प्रचारापासून काहीसे अंतर राखल्याचे दिसून येत आहे. आधीच्या कार्यक्रमानुसार काँग्रेस नेते राहुल गांधी व मुख्यमंत्री केजरीवाल संयुक्तपणे रोड शो करण्याचे ठरविले होते; परंतु खासदार मालीवाल प्रकरणानंतर काँग्रेसने ‘आप’पासून दूर राखण्याचे ठरविले आहे. राहुल गांधी यांनी आपच्या ‘झाडू’वर मतदान करण्याचे आवाहन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले, तरी अद्यापही दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र आलेले दिसले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT