Satara Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : उदयनराजेंना दिलेला 'शब्द' अमित शहा पाळणार? साताऱ्याच्या उमेदवारीवरून भाजप-राष्ट्रवादीत घमासान!

भाजपकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबतचा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्याशिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Lok Sabha Constituency) अद्याप महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या पक्षांत सध्यातरी शांतता आहे. खासदार उदयनराजेंना (Udayanraje Bhosale) साताऱ्यातून उमेदवारी देण्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शब्द दिला असला, तरी त्याची घोषणा झालेली नाही, तर दुसरीकडे सातारा मतदारसंघ सोडणार नाही, अशी भूमिका घेत अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

त्यावरून भाजप व राष्ट्रवादीत वाद पेटण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीची बैठक आज (मंगळवार) पुण्यात होत असून, यामध्ये साताऱ्यातील उमेदवारीवर चर्चा होणार आहे. सातारा लोकसभेचा तिढा सुटलेला नाही. महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्याशिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

भाजपकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबतचा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सातारा लोकसभा मतदारसंघावर आमचाच दावा असून, हा मतदारसंघ आम्ही सोडणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज (मंगळवार) पुण्यात बैठक होणार असून, यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्यातील आमदारांना पुण्यात बोलावले आहे, तसेच या वेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

सध्यातरी सातारा व माढा मतदारसंघांवरून राष्ट्रवादीत नाराजीचा सूर असल्याने दोन्हीपैकी एक जागा सोडावी, अशी आग्रही मागणी अजित पवारांपुढे त्यांचे आमदार करणार आहेत. परिणामी, अजित पवार व त्यांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे महाशक्ती केंद्रीय मंत्री अमित शहा साताऱ्याचा, की माढ्याचा निर्णय बदलणार याची उत्सुकता आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माढा व साताऱ्यात डावलले गेल्यास त्याचा परिणाम महायुतीच्या उमेदवाराच्या मताधिक्यावर होणार असून, राष्ट्रवादीची मते शरद पवारांच्या उमेदवाराकडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

  • सातारा, माढा मतदारसंघांवरून राष्ट्रवादीत नाराजीचा सूर

  • दोन्हीपैकी एक जागा सोडण्यासाठी आमदार करणार अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी

  • दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादीला डावलल्यास महायुतीच्या उमेदवारांच्या मताधिक्यावर परिणामाची भीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT