Eknath Shinde sakal
लोकसभा २०२४

Eknath Shinde : काँग्रेस नेत्यांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा ; महायुतीच्या प्रचारार्थ संभाजीनगरात मेळावा

‘‘निवडणुकी आल्या की, काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलू लागतात. भाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची पाकिस्तानची अशा देशद्रोही काँग्रेसला निवडणुकीत हद्दपार करा’’,

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘निवडणुकी आल्या की, काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलू लागतात. भाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची पाकिस्तानची अशा देशद्रोही काँग्रेसला निवडणुकीत हद्दपार करा’’, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. दहा) केला.

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी पार पडलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, भुमरे, नीलम गोऱ्हे, अतुल सावे, संजय शिरसाट, शीतल म्हात्रे, प्रदीप जैस्वाल, अर्जुन खोतकर, शिरीष बोराळकर, राजेंद्र जंजाळ आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात जे झाले नाही ते मागील १० वर्षांत पूर्ण झाले. देशाचा विकास, प्रगती मोदींच्या कार्यकाळात झाली. वर्ष २०१४ आधी बॉम्बस्फोट, घोटाळे व्हायचे. २०१४ नंतर बॉम्बस्फोट झाले का? पंतप्रधानांवर कुठलाही डाग नाही. २०१४ आधी यांनी किती घोटाळे केलेत. आज देशात १० वर्षांत आणि राज्यात २ वर्षांत काम झाली आहेत. पाकिस्तानचे कंबरडे मोडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. विरोधकांकडे पाकिस्तानची तळी उचलणारे आहेत. आपल्याकडे गरीब कल्याणाचा झेंडा आहे तिकडे बेइमानीचा झेंडा आहे’’, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली.

खैरेंचा सध्या खैरोद्दीन

भुमरे म्हणाले, ‘‘निवडणुकीचा अर्ज भरताना चंद्रकांत खैरेंना प्रश्न पडला होता, फॉर्मवर औरंगाबाद लिहायचे की छत्रपती संभाजीनगर? खैरेंचा सध्या खैरोद्दीन झाला. मुस्लिमांना नमाज पडण्याची भाषा ते बोलत आहे. त्यामुळे खैरेंच हिंदुत्व म्हणजे नौटंकी आहे.’’ दरम्यान, भुमरे यांनी मुंबई ते गुवाहाटी प्रवासातील किस्से, गमतीजमती सांगून सर्वांनाच पोट धरून हसायला भाग पाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारूच्या ठेक्यावर कारवाई करायला पोलीस गेले, प्यायला गेलेल्यानं कार वेगात पळवली; ५ जणांचा चिरडून मृत्यू, अनेकजण जखमी

Amravati Child Abuse Case : संतापजनक! सावत्र मुलावर बापानं केला लैंगिक अत्याचार; स्वयंपाक घरात नेलं अन् जबरदस्तीनं त्याच्यावर..., आई पाहतच राहिली!

Delhi Tourism: दिल्लीकरांसाठी गुड न्यूज! लवकरच यमुना नदीवर क्रूझ सेवा सुरू, जाणून घ्या कोणते सुविधा मिळणार

हवा तसा अहवाल देण्यासाठी पोलिसांचा दबाव, महिला डॉक्टरचे चार पानी पत्रात खळबळजनक आरोप

Kolhapur Kagal Video : कागलला उरुसात जायंट व्हील पाळण्यात नागरिक अडकले, तब्बल २ तासांचा थरार; पाळणा लॉक झाला अन्

SCROLL FOR NEXT