लोकसभा २०२४

Loksabha Election : लग्नसोहळ्यांतही रंगतोय प्रचाराचा फड ; साहेब आले म्हणून नागरिक अन् मतदार भेटले म्हणून उमेदवार खुश

सध्या लग्नाच्या तिथी दाट असल्याने लग्नसराईची धामधूम सुरू आहे. ग्रामीण भागातील बहुतेक जण शेतीतील कामे कमी झाल्याने या विवाहांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील बहुतेक उमेदवार लग्न समारंभांनाच आवर्जून हजेरी लावून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शहरटाकळी : सध्या लग्नाच्या तिथी दाट असल्याने लग्नसराईची धामधूम सुरू आहे. ग्रामीण भागातील बहुतेक जण शेतीतील कामे कमी झाल्याने या विवाहांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील बहुतेक उमेदवार लग्न समारंभांनाच आवर्जून हजेरी लावून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे सोहळ्याला पुढारी साहेब आले म्हणून यजमान आणि मतदार भेटले म्हणून उमेदवार खुश, असे चित्र दिसत आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. प्रचाराला काहीच दिवस उरले असल्याने उमेदवार प्रचाराला लागले आहेत. नेत्यांना प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने धावाधाव करून प्रत्येक जण आपापल्या परीने मतदारांना भेटून आपली निवडणूक लढवण्यामागची भूमिका पटवून देताना दिसत आहे.

एकाच दिवशी अनेक विवाह सोहळे असले, तरी घरातील प्रत्येकावर वेगवेगळ्या विवाहाला हजर राहण्याची जबाबदारी देण्यात आलेली असते. एका विवाह समारंभात किमान २० ते २५ गावांचे मतदार उपस्थित झालेले असतात. ही बाब लक्षात घेऊन नेतेमंडळी सोहळ्याला आवर्जून हजेरी लावत आहेत. विवाह समारंभात हे नेते वधू-वरांना आशीर्वाद देताना आपला प्रचारही करून घेत आहेत.

लग्न समारंभामुळे आपोआप प्रचार होण्यास मदत होत आहे. ग्रामीण भागातील विवाह समारंभ हे साधारणपणे दुपारच्या वेळीच असतात. त्यामुळे एकाच दिवसात अनेक विवाह समारंभांस उपस्थित राहता येते.

बैठकांच्या वेळेत बदल

विवाह समारंभांना उपस्थित राहणे हे उमेदवारासाठी प्रचाराची मोठी पर्वणी ठरत आहे. एखाद्या लग्नसमारंभास हा उमेदवार उपस्थित राहिला, तर एकाच वेळी हजारो मतदारांपर्यंत पोहोचून त्याला आपला प्रचार करता येत आहे. त्यामुळे ते आपल्या नियोजनात बैठकांच्या वेळाही बदलत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT