trinamool congress sakal
लोकसभा २०२४

Trinamool Congress : तृणमूल खासदारांची पोलिसांकडून उचलबांगडी

भाजप आणि तृणमूल काँग्रेसची पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेली राजकीय लढाई आता दिल्लीत येऊन पोहोचली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजप आणि तृणमूल काँग्रेसची पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेली राजकीय लढाई आता दिल्लीत येऊन पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी, सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राष्ट्रीय तपास संस्‍थेच्या (एनआयए) प्रमुखांची तत्काळ बदली करावी या मागणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले. अखेर, दिल्ली पोलिसांनी या खासदारांची उचलबांगडी करून त्यांना ताब्यात घेतले.

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन, सागरिका घोष, दोला सेन, साकेत गोखले यांच्यासह अन्य नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन सीबीआय, ईडी, एनआयए, प्राप्तिकर विभागाच्या प्रमुखांची तत्काळ बदली करावी अशी मागणी केली.

बाहेर आल्यानंतर या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलनही सुरू केले. यावेळी पोलिसांनी तृणमूल काँग्रेस खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्यांना पोलिसांनी अक्षरशः उचलून गाडीत टाकले.

आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने

तृणमूलच्या खासदार दोला सेन म्हणाल्या, आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या हातातील खेळणे असलेल्या तपास यंत्रणांच्या प्रमुखांना बदलण्यासाठी आम्ही निवडणूक आयुक्तांची भेट घेतली व आंदोलन सुरू केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT