Solapur Loksabha  sakal
लोकसभा २०२४

Solapur Loksabha : प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी आज राहुल गांधींची सभा ; एक्झिबिशन ग्राउंडवर आयोजन

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त उद्या (बुधवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोलापूर शहरातील मरिआई चौकातील एक्झिबिशन ग्राउंडवर सभा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त उद्या (बुधवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोलापूर शहरातील मरिआई चौकातील एक्झिबिशन ग्राउंडवर सभा होणार आहे. केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवरून राहुल गांधी सभेच्या ठिकाणी येणार आहेत. दुपारी चार वाजता त्यांची सभा सुरू होणार आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच राहुल गांधी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. सोलापूरची विमानसेवा बंद असल्याने ते सिंहगड महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर उतरणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त सोलापूर शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जागोजागी तैनात करण्यात येणार आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय ते सभेचे ठिकाणी या रस्त्यावर पोलिस बंदोबस्त असणार आहे.

राहुल गांधी सोलापूर दौऱ्यावर असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट व १८ अधिकारी सोलापूर शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी देखील हेलिपॅडसह सभेच्या ठिकाणाची पाहणी केली आहे.

राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील साडेबाराशे पोलिस अंमलदार, पाचशे होमगार्ड, तीन पोलिस उपायुक्त, सात सहायक पोलिस उपायुक्त, जवळपास १०० पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक असा पोलिस बंदोबस्त लावला जाणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय नेत्याची पहिलीच सभा सोलापूर शहरात होत असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. बंदोबस्तासह त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे पाहात आहेत.

शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या (बुधवारी) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मोडनिंब (ता. माढा) येथून ते मोहोळमध्ये येणार आहेत. त्या ठिकाणी भाजप नेते संजय क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार तुळजापूरला जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

Thane: ठाकरे गटाच्या बैठकीत मोठा गोंधळ! शाखेत अचानक ६० ते ७० जणांचा प्रवेश, शाखाप्रमुखांवर जोरदार हल्ला; नेमकं काय घडलं?

Shashikant Shinde Jayant Patil : जयंत पाटील आणि शशिकांत शिंदेंमध्ये दुरावा?, शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं; कोल्हापुरातून पक्षाची बांधणी करणार

"पॉकेटमनीसाठी बाप पाहिजे आदर करण्यासाठी नको" सावत्र भावाचे प्रतीक बब्बरवर आरोप; "आता त्यांना बाबा म्हणत नाही"

SCROLL FOR NEXT