Rahul Gandhi sakal
लोकसभा २०२४

Rahul Gandhi : ‘भाजप-बीजेडी पक्षांत साटेलोटे’

ओडिशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सभा झाली. या सभेत भाजप आणि बीजेडीवर त्यांनी हल्लाबोल केला.

सकाळ वृत्तसेवा

बालासोर (ओडिशा) : ओडिशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सभा झाली. या सभेत भाजप आणि बीजेडीवर त्यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दोन्ही पक्षांत साटेलोटे असून, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते खरोखरच एकमेकांविरोधात असते तर नवीन पटनाईक यांच्याविरुद्ध आतापर्यंत एकही खटला का दाखल झाला नाही? माझ्यासारखे भाजपने त्यांना का छळले नाही, असा सवाल त्यांनी केला.

ते म्हणाले, भाजप आणि बीजेडी हे अघोषित आघाडीच्या रूपातून काम करत आहेत. त्यांची आघाडी मुळातच जनतेचा पैसा लुटण्यावर, खाणींची लयलूट करण्यावर केंद्रित आहे. या दोन्ही पक्षांना ओडिशाची संपत्ती हडप करायची आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

ते म्हणाले, पटनाईक हे खरोखरच भाजपविरुद्ध लढत असतील तर त्यांच्याविरुद्ध खटले दाखल का झाले नाही? कारण बीजेडीचे पटनाईक हे भाजपसाठी काम करतात. मी जेव्हा भाजपविरुद्ध लढतो तेव्हा माझ्याविरुद्ध २४ खटले दाखल झाले. माझे लोकसभा सदस्यत्व काढून घेतले, मला दोन वर्षांची शिक्षा सुनावली. ईडीने माझी ५० तास चौकशी केली. पण पटनाईकबाबत असे काही घडले नाही. तेलंगणातही भाजप व बीआरएस यांच्यात छुपी मैत्री होती. परंतु काँग्रेसने विधानसभेत त्यांचे कंबरडे मोडले.

‘ईव्हीएम मशिनवर लक्ष ठेवा’

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशिनवर लक्ष ठेवावे, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी प्रचार संपल्यानंतर एक व्हिडिओ ‘एक्स’ वर जारी केला. ते म्हणाले, प्रचारात काळात जनतेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला. परंतु इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी जनतेचे प्रश्नांना लावून धरले. या प्रश्नांना लोकांनी प्रतिसाद दिला त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे. यादरम्यान, कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT