Loksabha Election 2024  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : राहुल गांधी यांची पुण्यात सभा

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह जिल्ह्यातील चार उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची शुक्रवारी (ता. ३) पुण्यात सभा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह जिल्ह्यातील चार उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची शुक्रवारी (ता. ३) पुण्यात सभा होणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत गांधी यांनी पुण्यातील युवकांशी संवाद साधला होता. त्यानंतर ते पाच वर्षांनी पुण्यात सभेसाठी येत आहेत.

गांधी यांचे शुक्रवारी दुपारी तीन वाजता पुण्यात आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाजवळील (आरटीओ) ‘एसएसपीएमएस’ संस्थेच्या मैदानात ते सभेला संबोधित करतील. यावेळी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि प्रचारप्रमुख मोहन जोशी यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात मोदींची पुण्यात सभा झाली. त्यात राहुल गांधी यांचा ‘शहजादे’ असा उल्लेख करून धर्माच्या आधारावर मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा आणि वारस लावून संपत्तीचे मुस्लिमांमध्ये वाटप करण्याचा आरोप काँग्रेसवर केला होता. मोदींनी केलेल्या आरोपाला गांधी काय उत्तर देणार? याकडे लक्ष लागून आहे.

सुरक्षाव्यवस्थेचा खुर्च्यांना फटका...

सभेच्या निमित्ताने काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मैदानाची आसनक्षमता ४० ते ५० हजार खुर्च्यांची आहे. परंतु सुरक्षेच्या कारणामुळे विशेष सुरक्षा दलाने व्यासपीठासमोरील बाजूस मोठी जागा (डी) मोकळी सोडण्यास सांगितले. त्यामुळे जवळपास १२ ते १५ हजार खुर्च्या कमी कराव्या लागणार आहेत. परिणामी ३० ते ३५ हजार आसनक्षमता असणार आहे. सभेला येणाऱ्यांसाठी कैलाश स्मशानभूमी लगतच्या पुढील बाजूस मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था केली आहे.

...अशी आहे व्यवस्था

  • सभेसाठी ४० बाय ३० फुटांचे भव्य व्यासपीठ

  • ‘एसएसपीएमएस’च्या पहिल्या क्रमांकाचे प्रवेशद्वार आणि ‘आरटीओ’नजीक ‘सुदर्शन केमिकल्स’मधून मतदार व कार्यकर्त्यांना प्रवेश; मधला रस्ता गांधी यांच्यासाठी राखीव

  • उष्माघाताचा त्रास झाल्यास तातडीने उपचारासाठी पक्षाच्या डॉक्टर सेलचे तज्ज्ञ; रुग्णवाहिकाही तैनात

  • चार एलईडी स्क्रीनची व्यवस्था

  • नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT