Rohini Khadse sakal
लोकसभा २०२४

Rohini Khadse : शरद पवारांना सोडणे मला न पटणारे ; ॲड. रोहिणी

‘‘मी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेला मानते. आमच्यासाठी त्यांची विचारधारा महत्त्वाची आहे. शरद पवार यांनी मागील साडेतीन वर्षांत आम्हाला खूप मोठी साथ दिली आहे. म्हणूनच पवार यांना सोडून जाणे माझ्या मनाला पटत नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘मी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेला मानते. आमच्यासाठी त्यांची विचारधारा महत्त्वाची आहे. शरद पवार यांनी मागील साडेतीन वर्षांत आम्हाला खूप मोठी साथ दिली आहे. म्हणूनच पवार यांना सोडून जाणे माझ्या मनाला पटत नाही. पक्षात यापुढेही जोमाने काम करून उमेदवार निवडून आणणार आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी सोमवारी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार निश्‍चितीसाठी सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी बैठक झाली. पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील यांच्याशी चर्चा केली. या वेळी खडसे उपस्थित होत्या.

एकटे पडल्याची भावना

अनेक वर्षे मी खडसे साहेबांसोबत काम करत आले आहे. त्यांच्या निर्णयामुळे आज एकटे पडल्यासारखे वाटत आहे. पण माझ्या मतदारसंघातील जनता, नेते माझ्यासोबत आहेत. मी अनेक वर्षे राजकारणात आहे, त्यामुळे कोणत्या पक्षात थांबायचे, याबाबत निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात आहे. कुठे काम करावे आणि कुठे नाही, याबाबत मला कळते, असेही त्या म्हणाल्या.

उमेदवार काही ठरेना !

रावेर लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असणार, याविषयी मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. सोमवारी पुण्यात शरद पवार, जयंत पाटील हे इच्छुक उमेदवारांसमवेत चर्चा करणार असल्याने दिवसभर तर्कवितर्क लढविले जात होते. रात्रीपर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र दिवसभर चर्चा होऊनही उमेदवाराचे नाव निश्‍चित झाले नाही. आता मंगळवारी (ता. ९) उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT