Sangli Loksabha Constituency  sakal
लोकसभा २०२४

Sangli Loksabha Constituency : चंद्रहार सेनेच्या यादीत,विशाल पाटील दिल्लीत ; सांगलीबाबत वेगवान घडामोडी

सांगली लोकसभा मतदार संघाबाबत आज अत्यंत वेगवान घडामोडी घडल्या. शिवेसना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारांच्या यादीत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली, तर काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेत सांगलीवरील दावा सोडू नका, अशी विनंती केली.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघाबाबत आज अत्यंत वेगवान घडामोडी घडल्या. शिवेसना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारांच्या यादीत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली, तर काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेत सांगलीवरील दावा सोडू नका, अशी विनंती केली. शिवसेनेच्या यादीवर काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महाविकास आघाडीत ताण आणखी वाढला. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने माजी आमदार प्रकाश शेंडगे सांगलीतून लढणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, अशी घोषणा केली आहे.

महाविकास आघाडीत सांगलीबाबतचा ताण वाढवणाऱ्या घडामोडींनी आजचा दिवस गाजला. शिवसेना (ठाकरे) पक्षातून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हेच लढतील, यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. चंद्रहार पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत सेनेत प्रवेश केला होता. तेथेच उमेदवारीचे संकेत मिळाले होते. मिरजेत उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद सभा घेतली, त्यावेळीही चंद्रहार यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. आज थेट उमेदवार यादीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसैनिकांनी त्याचे स्वागत केले.

काँग्रेस नेत्यांकडून दिल्लीत भेटीगाठी

शिवसेनेची यादी जाहीर होत असताना काँग्रेस नेते दिल्लीच्या विमानात होते. आमदार विश्‍वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे दुपारी दिल्लीत दाखल झाले. आधी त्यांनी वरिष्ठ नेते मुकुल वासनिक यांची भेट घेतली. त्यानंतर के. सी. वेणुगोपाल यांना भेटून आग्रही भूमिका मांडली. सायंकाळी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत काँग्रेस सांगली लढायला तयार आहे, असा संदेश दिला.

रात्री उशिरा विश्‍वजीत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत. या नेत्यांकडून सांगलीतील परिस्थितीचा आढावा सादर करण्यात आला. शिवसेना ज्या पद्धतीने सांगलीसाठी रेटा लावत आहे, तो चुकीचा आहे. शिवसेनेने माघार घ्यावी, अन्यथा काँग्रेसने येथून मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. श्री. खर्गे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काँग्रेस नेते बोलतील. त्यांनी विनंती मान्य केली नाही, तर काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.

खर्गे यांना विशाल पाटील यांनी गेली ८० वर्षे वसंतदादांचे कुटुंब काँग्रेसच्या सेवेत असल्याचा दाखला दिला. शिवसेना सात दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळण्यासाठी आग्रह करत आहेत. आमचे आजोबा स्वातंत्र्य लढ्यात होते. तेव्हापासून काँग्रेससोबत आहोत. आम्हाला का संघर्ष करावा लागतोय, अशी भूमिका मांडली. केवळ हट्ट म्हणून नव्हे, तर मेरिटवर उमेदवारी मिळावी, आम्ही सांगली पुन्हा जिंकून दाखवू, असा विश्‍वास पाटील यांनी नेत्यांना दिला.

प्रकाश शेंडगे लढल्यास ‘वंचित’चा पाठिंबा

दरम्यान, सांगली मतदार संघात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे सांगलीतून लढण्याच्या तयारीत आहेत. शेंडगे लढणार असतील, तर वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल, अशी घोषणा वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात केली. शेंडगे यांनी सांगलीतून लढण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. ते मैदानात आल्यास सांगलीची निवडणूक बहुरंगी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT