Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : विशाल, पृथ्वीराज पाटलांची काँग्रेसने हकालपट्टी करावी ; संजय विभूतेंची मागणी,श्रमपरिहार नव्हे, हे जखमेवर मीठ

महाविकास आघाडीच्या विरोधात सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोर केलेल्या विशाल पाटील यांना बोलावून काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार केला.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : महाविकास आघाडीच्या विरोधात सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोर केलेल्या विशाल पाटील यांना बोलावून काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार केला. सांगलीत शिवसेनेच्या विरोधात अंडरग्राउंड सगळी यंत्रणा पृथ्वीराज पाटील हाताळत होते. शिवसेनेच्या व्यासपीठावर थोडा वेळ बसायचे आणि खाली उतरले की विशाल यांच्या कामाला लागायचे. आता विशाल पाटील यांच्यासह पृथ्वीराज पाटील यांचीदेखील काँग्रेसने हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केली आहे.

पृथ्वीराज पाटील यांनी आमदार विश्‍वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमपरिहार जेवण दिले. त्यावर श्री. विभूते यांनी टीका केला. हा श्रमपरिहार नव्हे तर शिवसेनेच्या जखमेवर चोळलेले मीठ आहे. आम्ही याचा वचपा नक्की काढू. सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, जत या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विधानसभेची पायरी चढू देणार नाही, अशी शपथ शिवसैनिकांनी घेतली आहे, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी एकमेकाच्या विचारातून लढली. तशाच जागा ठरल्या. जागा वाटपापर्यंत वादंग ठीक होते, नंतर जे झाले, तो घात होता. राष्ट्रवादीने उलटे काम केलेच, पण काँग्रेसने एकदाही शिवसेनच्या प्रचारात सहभाग घेतला नाही. काही तात्पुरते आले आणि नंतर विशाल पाटलांच्या प्रचारात सहभागी झाले. जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी तर ‘विलासराव जगताप आमचे दुश्‍मन आहेत, त्यांना भेटायला खासदार संजय राऊत यांना घेऊन का गेलात?’ असा सवाल केला.

जगतापांनी विशाल यांना पाठिंबा दिलेला चालतो. त्याच विशाल यांचे तुम्ही काम करता आणि आम्ही फक्त भेटलो तर तुम्हाला राग का यावा? ही भूमिका बरोबर नाही.’’ ते म्हणाले, ‘‘बंडखोर हा काँग्रेसचाच आहे, असे त्यांनी भासवले. सांगली पृथ्वीराज पाटील यांनी निकालाची वाट न पाहता बंडखोराला बोलावले, तो काँग्रेसचा आहे असे दाखवत त्यांच्या सोबत स्नेहभोजन केले. त्यांना किंमत मोजावी लागेल.’’

जयंतराव काय आदर्श घ्यावा?

आमदार जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सांगली जिल्ह्यात त्यांचे लोक भाजपचा आणि अपक्षाचा प्रचार करत होते. जयंतराव त्यांना अडवू शकले नाहीत. मग त्यांच्या पदाचा उपयोग काय? जयंतरावांचा जिल्हा आहे. महाराष्ट्राने त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा, असे सवाल संजय विभूते यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील नागरिकांची मोठी गर्दी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT