Sunil tatkare
Sunil tatkare sakal
लोकसभा २०२४

Sunil Tatkare : अजित पवारांचे नेतृत्व, मोदींसाठी मते

सकाळ वृत्तसेवा

- विजय चोरमारे

राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) लोकसभेसाठी महायुतीमध्ये मिळणाऱ्या जागांबाबतचे विविध अंदाज व्यक्त होत आहेत आणि त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यासह पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील भूमिकेच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न - राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीची रणनीती काय राहील?

सुनील तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युतीने एकत्र लढतो आहोत. देशाला सलग दहा वर्षे भक्कम अन विकासाभिमुख नेतृत्व देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशापुरतेच नव्हे, तर या भारताचे जगभरात नेतृत्व देण्यासाठी आम्ही सोबत आहोत. नरेंद्र मोदी यांचेच पंतप्रधान म्हणून नेतृत्व राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण आम्हाला पुढे न्यायचे आहे. केंद्र सरकारने दहा वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी राबवलेल्या योजना, त्यातून सामान्य माणसांचा झालेला उत्कर्ष आणि भविष्यातील विकासाची ‘गॅरंटी’ घेऊन आम्ही मतदारांकडे जात आहोत. तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे आणि एकसंधपणे लढणे ही आमची रणनीती आहे. महायुतीतील कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी तो मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी निवडून द्यायचा आहे, असे मानून आम्ही एकजुटीने काम करणार आहोत.

महायुतीत जागावाटपामध्ये तुमच्या पक्षाचा सन्मान राखला जातोय असे वाटते का?

- सन्मान तर राखलाच जाईल. आपला हा प्रश्न जागावाटपाचे सूत्र जाहीर झाल्यानंतर उरणार नाही. सन्मानजनक जागा आम्हाला मिळणार हा आमचा विश्वास आहे.

शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आशा रीतीने भाजप प्रादेशिक पक्ष संपवत आहे असे वाटत नाही का?

- हे बघा पक्षांतर्गत बहुमताचा आधार राज्यघटनेने दिलेला आहे. या पक्षांतर्गत बहुमताचा आम्ही आदर करतो. राजकारणात भावनिकता महत्त्वाची नसून बहुमताचा आदर करावा लागतो. पक्षात लोकनियुक्त सदस्यांची भावना आणि भूमिका महत्त्वाची असते. आम्ही या भूमिकेला लोकशाहीवादी म्हणून महत्त्व देतो. राजकारणात अनेक प्रकारचे आरोप होत असतात, त्याचा प्रतिवाद प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करीत असतो.

तुमचा पक्ष मोदींच्या नावावर मते मागणार की अजित पवार यांच्या?

- अजित पवार हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आम्ही भारतीय जनता पक्षासोबत युतीत आहोत. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे देशाच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असल्याने आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात नरेंद्र मोदी यांच्यासाठी मते मागणार आहोत.

गद्दारी किंवा पक्ष चोरल्याच्या आरोपाचा प्रतिवाद तुम्ही कसा करणार आहात? तुम्ही भाजपच्या ‘वॉशिंग मशिन’ धोरणाचे लाभार्थी आहात असाही आरोप केला जातो.

- खरंतर लोकशाही मानणारे आपण सर्व आहोत. लोकशाहीत न्यायव्यवस्था हा एक स्तंभ आहे. तर पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे. पण न्यायव्यवस्थेची भूमिका पत्रकारिता घेऊ शकत नाही. तरीही जे न्यायालयात सिद्ध होत नसतानाही अकारण कोरडे ओढत बसते हे या लोकशाहीचे दुर्दैव आहे. तुमचा हा प्रश्न न्यायालयीन चौकटीत आहे. तरीपण आपण तेच ते विचारत असाल, तर याचे अंतिम उत्तर न्यायालयात आहे. पण लोकशाहीत असे प्रश्न करण्याचा तुमचा अधिकार असला तरी निवाडा करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. तुम्हाला हे मान्य असो अथवा नसो, पण भारतीय लोकशाहीत न्याययंत्रणा सर्वोच्च आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची भविष्यात काही शक्यता दिसते का?

- राजकारण हे कायम बेरजेचे असावे असे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण म्हणत होते. आम्ही यशवंतराव चव्हाण यांचे अनुयायी असून तेच आमचे आदर्श आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT