Baramati Loksabha Constituenc sakal
लोकसभा २०२४

Baramati Loksabha Constituency : सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार 18 एप्रिलला अर्ज दाखल करणार...

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी विद्यमान खासदार महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार 18 एप्रिल रोजी पुण्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी विद्यमान खासदार महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार 18 एप्रिल रोजी पुण्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 19 एप्रिल आहे. बारामतीतील प्रमुख लढत सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार अशीच होईल हे स्पष्ट झाले आहे. अजून इतर कोण उमेदवार अर्ज दाखल करतात या वरही मतांची किती विभागणी होणार हेही ठरणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच सहा विधानसभा मतदारसंघात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. प्रचंड उन्हात कार्यकर्त्यांना प्रचार करावा लागत आहे. त्या मुळे दुपारी प्रचार देखील थंडावत आहे. पूर्ण निवडणूकच भर उन्हात होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांपुढे या कडक उन्हाचे आव्हान उभे ठाकले आहे.

दरम्यान 18 एप्रिल रोजी दोन्ही बाजूंकडून मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. महायुतीकडून बारामतीसोबतच पुणे व शिरुर मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व शिवाजीराव आढळराव पाटील हेही अर्ज दाखल करणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रसंगी उपस्थित राहणार असून तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यात जाहीर सभाही होणार आहे. बारामती मतदारसंघात आता हळुहळू निवडणूकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. प्रचारसभा, कोपरासभा, प्रत्यक्ष गाठीभेटी, संवाद, कार्यक्रमांना उपस्थिती, पत्रकवाटप, रॅली, पदयात्रा या माध्यमातून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराला वेग देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

सभातून जसे आरोप प्रत्यारोप होत आहे, त्याच प्रमाणे सोशल मिडीयावर व्हॉटसअँप, फेसबुक व इन्स्टाग्रामचा युवा कार्यकर्ते प्रभावीपणे वापर करत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे नेमके काय सुरु आहे हे मतदारही उत्सुकतेने पाहत आहेत.

आता उत्सुकता स्टार प्रचारकांच्या सभांच्या....

देशातील सर्वात लक्षवेधी लढत असलेल्या बारामतीत दोन्ही बाजूंनी कोण कोण स्टार प्रचारक सभा घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 5 मे रोजी बारामतीचा जाहीर प्रचार संपणार आहे. आगामी 20 दिवसात या मतदारसंघाचे वातावरण ढवळून निघेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT