Satara Madha Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : सातारा, माढ्यासाठी पाडव्याचा मुहूर्त? शरद पवारांकडून घोषणेची शक्यता; भाजपमध्ये सस्पेन्स

सातारा लोकसभेच्या (Satara Lok Sabha) उमेदवारीचा सस्पेन्स महायुती व महाविकास आघाडीने कायम ठेवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सातारा लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून कोणाची ही उमेदवारी घोषित झालेली नाही.

सातारा : सातारा लोकसभेच्या (Satara Lok Sabha) उमेदवारीचा सस्पेन्स महायुती व महाविकास आघाडीने कायम ठेवला आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या घोषणेबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

माढासाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार (Sharad Pawar) यांनी संजीवराजे निंबाळकर व धैर्यशील मोहिते- पाटील यापैकी एकाच्या नावावर एकमत करण्याची संधी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होण्यास सहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे येत्या मंगळवारी होणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सातारा व माढा लोकसभेच्या (Madha Lok Sabha) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. अवघे सहा दिवस बाकी असूनही अद्याप साताऱ्यासाठी महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. माढातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांची यापूर्वीच घोषणा केली आहे. आता त्याविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उभे केले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आहे. त्यामुळे माढ्यातून त्यांनी फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, तर अकलूजचे धैर्यशील मोहिते- पाटील यांच्यापैकी एकाला संधी देण्याचे निश्चित केले आहे. या दोघांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन एक उमेदवार देण्याची संधी श्री. पवार यांनी दिली आहे. येत्या गुढीपाडव्याला धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे.

उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तुतारीच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी नकार दिल्यास आमदार शशिकांत शिंदेंच्या नावावर श्री. पवार शिक्कामोर्तब करणार आहेत; पण त्यासाठी दोन्हीकडच्या नेत्यांना मुहूर्त हवा आहे. येत्या मंगळवारी गुढीपाडव्याचा सण आहे. या पाडव्याच्या मुहूर्तावर सातारा व माढातील राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

भाजप-राष्ट्रवादीत रस्सीखेच

सातारा लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून कोणाची ही उमेदवारी घोषित झालेली नाही. महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे, तरीही भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मी लोकसभा लढणारच, असे ठणकावत प्रचारास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा भाजपकडून कधी होणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT