Ahmednagar Loksabha
Ahmednagar Loksabha sakal
लोकसभा २०२४

Ahmednagar Loksabha : लंकेंमुळे विखेंची झोप उडाली ,पवार ; अहमदनगरमध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : ‘‘नीलेश लंकेंमुळे विखे बाप-लेकांची झोप उडाली अाहे. त्यांनी एका उद्योजकाला माझ्याकडे मध्यस्थीसाठी पाठवले होते. लंके सोडून दुसऱ्याला उमेदवारी द्या, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु मी त्यांचे ऐकले नाही. यावरून ते लंकेंना किती घाबरलेत हे दिसते,’’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला.

नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप आज झाला. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘‘आपला उमेदवार हिरा आहे. तो या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न नक्कीच प्रभावीपणे मांडील. त्यांना भाषेची कोणतीही अडचण येणार नाही. विखे पिता-पुत्रांना आत्मविश्वास नाही. ते या पक्षातून त्या पक्षात फिरत असतात. लंके यांच्याकडे संपत्ती नाही, परंतु माणुसकी आणि लोकप्रेमाचा खजिना आहे.’’ थोरात यांनीही विखेंवर टीका करताना ‘पाच वर्षे गडी दिसलाच नाही. दिल्लीला जाऊन मजा-हजा केली.

आता लोकांत मतासाठी दहशत करीत आहेत,’ असा आरोप केला. आदित्य ठाकरे यांनीही, लंके यांना आमचे शिवसैनिक अनिलभैय्यांची कमी पडू देणार नाहीत, अशी ग्वाही दिली. लंके म्हणाले,‘‘ नगरमध्ये व्यापारी घाबरलेत, पण हा लंके तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे. २४ तास तो तुम्हाला साथ देईल. तुमची दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न करतो आहे मला एकदा संधी द्या, रात्रंदिवस तुमच्या सेवेत राहील.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT