Shambhavi Choudhary sakal
लोकसभा २०२४

Shambhavi Choudhary : बिहारमधील तीन युवा चेहरे लोकसभेत ; ‘एलजेपी’च्या शांभवी चौधरी सर्वांत कमी वयाच्या खासदार

बिहारमधून तीन युवा चेहरे यंदा लोकसभेत पोहोचले आहेत. पाटलीपुत्र मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार आणि पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती आणि औरंगाबादमधून अभय कुशवाह या तरुणांना मतदारांनी संधी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : बिहारमधून तीन युवा चेहरे यंदा लोकसभेत पोहोचले आहेत. पाटलीपुत्र मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार आणि पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती आणि औरंगाबादमधून अभय कुशवाह या तरुणांना मतदारांनी संधी दिली आहे. यातील तिसरा आणि सर्वांत चर्चेतील चेहरा म्हणजे लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) शांभवी चौधरी. समस्तीपूर (राखीव) मतदारसंघातून निवडून आलेल्या शांभवी केवळ २५ वर्षांच्या आहेत.

सर्वांत कमी वयात खासदार बनण्याचा विक्रम लालू प्रसाद यादव यांच्या नावावर होता. त्यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची पायरी चढली होती. त्यावेळी ते २९ वर्षांचे होते. यंदा लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ‘एलजेपी (आर)’चे चिराग पासवान यांनी शांभवी चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली होती. शांभवी यांचे वडील अशोक चौधरी हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांचे आजोबा महावीर चौधरी काँग्रेसचे दलित समाजातील मोठे नेते होते. अशोक चौधरी हे पूर्वी बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. नंतर त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून नितीश कुमार यांना साथ दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील प्रचारसभेत शांभवी या त्यांच्या मुलीसारख्या असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन समस्तीपूरमधील नागरिकांना केले होते.‘समस्तीपूरमधून निवडणूक लढविणाऱ्या शांभवी या देशातील सर्वांत कमी वयाची मुलगी आहे,’ असे मोदी यांनी म्हटले होते.

शांभवी चौधरी यांच्याविरोधात काँग्रेसचे सन्नी हजारी निवडणूक लढवित होते. त्यांचे वडील महेश्‍वर हजारी महेश्‍वर हजारी हेही नितीशकुमार सरकारमध्ये मंत्री आहेत. सरकारमधील दोन मंत्र्यांची मुले वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. शांभवी यांनी सन्नी यांचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

दोन ‘बाहुबली’ विजयी

बिहारमध्ये यंदा ‘बाहुबली’ मानले जाणारे अनेक उमेदवार रिंगणात होते. यातील दोघांनी निवडणूक जिंकली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते अजित सरकार यांच्या हत्येचा आरोप असलेले राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनी पूर्णियातून विजय मिळविला आहे. त्यांची पत्नी रंजित रंजन या छत्तीसगडमधून काँग्रेसच्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. जिल्हाधिकारी कृष्णैया यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी आनंद मोहन यांची पत्नी लव्हली आनंद या शिवहर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्या याआधीही खासदार होत्या.

पाच महिला लोकसभेत

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांपैकी पाच ठिकाणी महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. यात शांभवी चौधरी, लव्हली आनंद, मिसा भारती यांच्यासह सिवानमधून विजय लक्ष्मी कुशवाह (जेडीयू) आणि वैशाली मतदारसंघातील वीणा देवी (एलजेपी आर) या निवडून आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT