Dhairyasheel Mane vs Raju Shetti esakal
लोकसभा २०२४

Hatkanangle Loksabha : राजू शेट्टी भुलवत आणि झुलवत ठेवणारे नेते; निवडणूक जाहीर होताच धैर्यशील मानेंचा प्रहार

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या संभ्रमामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

'शेट्टी हे दरवेळी वेगळ्या भूमिकेत जातात. एकीकडे महाविकास आघाडीसोबत मी जाणार नाही म्हणतात. दुसरीकडे संजय राऊत यांच्यासोबत चर्चा करायला जाणार असे सांगतात.'

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) हे एकाचवेळी महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही दगडावर हात ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शेट्टी हे भुलवत आणि झुलवत ठेवणारे नेते आहेत. एकाचवेळी दोन्ही आघाड्यांशी चर्चेत राहून निवडून आलो की तुमचाच आहे, असा शब्द ते देतात,’ असा आरोप हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangle Loksabha Election) उमेदवारीच्या संभ्रमामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. या प्रश्नावर बोलताना खासदार माने यांनी, प्रत्येक पक्ष विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्र पक्षांचाही विस्तार करण्याचा प्रयत्न आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही विचारांची युती पूर्वीपासून केली आहे. निवडणुकीत जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत अशा गोष्टी होतच राहणार. ज्यावेळी स्पष्टीकरण येईल, त्यावेळी हे सर्व पक्ष एकत्र काम करतील.’

खासदार माने म्हणाले, ‘शेट्टी हे दरवेळी वेगळ्या भूमिकेत जातात. एकीकडे महाविकास आघाडीसोबत मी जाणार नाही म्हणतात. दुसरीकडे संजय राऊत यांच्यासोबत चर्चा करायला जाणार असे सांगतात. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मी निवडून आलो तर मी तुमचाच आहे, अशी चर्चा करतात. दोन्ही दगडावर हात ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांचा आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपोषणस्थळी भेटायला वेळ नाही, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस, शिंदेंच्या मंत्र्यांची असंवेदनशीलता

शाहिद आफ्रिदीने 'लायकी' दाखवली! अफगाणिस्तानला उपकाराची आठवण करून दिली ; म्हणतो, आम्ही तुम्हाला पोसतोय...

Sajjangad Torch Festival: सज्जनगड उजळला भक्तीच्या तेजात! 'दिवाळीच्या पहाटे हजारो मशालींनी गड प्रकाशमय'; इतिहास अन् शौर्याचा अनोखा संगम

CM Chief Minister Fadnavis : ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र: मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस : २७ टक्के आरक्षणानुसारच निवडणूका होतील

Stock Market Today: दिवाळीत शेअर बाजारात जोरदार वाढ; निफ्टी-सेन्सेक्स तेजीत, बँक निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक

SCROLL FOR NEXT