Hasan Mushrif Samarjeetsingh Ghatge esakal
लोकसभा २०२४

कोल्हापूर लोकसभेसाठी समरजित घाटगेंचे नाव आजपर्यंत माझ्या कानावर आले नाही; काय म्हणाले मुश्रीफ?

'राष्ट्रवादी अजित पवार गटाची मते आणि भाजपसोबत असलेली आमची मैत्री यामुळे सुनेत्रा पवार प्रचंड मतांनी विजयी होतील.’

सकाळ डिजिटल टीम

‘कोल्हापूरच्या दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आहेत. त्यावर विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळेल.'

कोल्हापूर : ‘कोल्हापुरात काँग्रेसकडून (Congress) श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) उमेदवार असले तरी आम्ही महायुतीसोबतच असून, महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, ‘गेल्या दोन-तीन निवडणुकांत खासदार सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) मते कमी झालेली आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी जिवाचे रान यापूर्वी केलेले आहे. या निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची मते आणि भाजपसोबत असलेली आमची मैत्री यामुळे सुनेत्रा पवार प्रचंड मतांनी विजयी होतील’, असेही मुश्रीफ म्हणाले.

‘कोल्हापूरच्या दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आहेत. त्यावर विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळेल’, असे सांगून मुश्रीफ म्हणाले,‘कोल्हापूर लोकसभेसाठी समरजित घाटगे यांचे नाव माझ्या कानावर आजपर्यंत आले नाही. परंतु तिन्ही पक्ष मिळून जे ठरवतील त्याच्याशी मी बांधील आहे. माझ्यासंदर्भात ईडी चौकशी झाली, मात्र या कंपन्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. आमदार प्रसाद लाड यांनी याचा खुलासा केलेला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT