Kolhapur Lok Sabha Elections esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Loksabha : आता आमचं नाही, 'आपलं' ठरलंय म्हणायचं; संजय मंडलिकांनी घेतली महाडिकांची भेट, चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Constituency) महायुतीचा उमेदवार असणार हे निश्चित आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या निवडणुकीत महाडिक आणि मंडलिक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. याकाळात त्यांनी एकमेकांवर टीकाही केली होती.

कोल्हापूर : ‘लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Elections) भाजपकडून महायुतीच्या उमेदवाराला सर्व सहकार्य केले जाईल. ही निवडणूक केवळ पक्षांची नाही तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची आहे. त्यामुळे आता आमचे नव्हे तर ‘आपलं ठरलंय’ अशी भूमिका घेतली पाहिजे. अशी चर्चा खासदार धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्यात झाली. आज संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी कावळा नाका येथील महाडिकांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Constituency) महायुतीचा उमेदवार असणार हे निश्चित आहे. त्यामुळे महायुतीमधील सर्व घटक पक्षातील नेत्यांचे एकमत असणे आवश्यक आहे. यापूर्वी वेगवेळ्या राजकीय परिस्थितीमध्ये आपापल्या पक्षाची, गटाची भूमिका घेऊन महायुतीमधील घटक पक्षांनी काम केले आहे. काही प्रसंगी एकमेकांवर टीकाही करावी लागली आहे. गेल्या निवडणुकीत महाडिक आणि मंडलिक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. याकाळात त्यांनी एकमेकांवर टीकाही केली होती.

नुकत्याच झालेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीतही परस्पर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार संजय मंडलिकांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आज मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांची त्यांच्या कावळा नाका येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांच्यात एक तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी महाडिक यांनी मंडलिक यांना निवडणुकीत पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

महाडिकांच्या कामाला मंडलिकांची पावती

बास्केट ब्रिज भूमिपूजन सोहळा झाला, त्यावेळी खासदार संजय मंडलिक व्यासपीठावर होते. ‘निवडणुकीच्या काळात आम्ही बास्केट ब्रिजबद्दल महाडिकांवर टीका केली होती. मात्र हा ब्रिज उपयुक्त असून महाडिकांनी हे काम तडीस नेले, अशी पोचपावतीही मंडलिकांनी खासदार धनंजय महाडिक यांना दिली होती. तेंव्हापासून दोघांतील संवाद वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT