Hatkanangale Lok Sabha Raju Shetti
Hatkanangale Lok Sabha Raju Shetti esakal
लोकसभा २०२४

'उसाला प्रतिटन 100 रुपये कारखानदारांकडून वसूल केल्याशिवाय सोडणार नाही'; राजू शेट्टींचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

'माझी लढाई ही कुणा एकाविरूध्द नाही. बरबटलेल्या व्यवस्थेला वटणीवर आणण्यासाठी मला पुन्हा संसदेत जायचे आहे.'

जयसिंगपूर : ‘सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत झगडत आलो आहे. संसदेत जाऊन पाच वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. करपलेल्या चेहऱ्यावर हास्यं आणायचे आहे. गतवर्षीचे ठरलेले उसाला प्रतिटन शंभर रुपये कारखानदारांकडून (Sugar Factory) वसूल केल्याशिवाय सोडणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला. चिंचवाड (ता. शिरोळ) येथे शनिवारी रात्री झालेल्या सभेत ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, ‘मागील गळीत हंगामातील शंभर रुपये घेतल्याशिवाय साखर सम्राटांना सोडणार नाही. गेली ३० वर्षे मी संघर्ष करत आलो आहे. गत निवडणुकीत २३ मे २०१९ रोजी माझा पराभव झाला. २४ मे पासून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नव्या उमेदीने बाहेर पडलो. मी खचणारा माणूस नाही तर लढणारा माणूस आहे. शेतकऱ्यांची (Farmers) परिस्थिती अतिशय विदारक होत चालली आहे.

आपल्यासमोर दुष्काळ उभा आहे. त्याच्याशी दोन हात करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने होताना अडचणी येत आहेत. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची मते हवी आहेत, पण त्यांना न्याय द्यायचा नाही. ज्या ज्या वेळी अन्याय होईल, त्यावेळी मी स्वस्थ बसणार नाही. काही जण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बदनामी करण्यासाठी शेतकऱ्यांचा ऊस मुद्दामहून जाळून नेत आहेत. माझी लढाई ही कुणा एकाविरूध्द नाही.

बरबटलेल्या व्यवस्थेला वटणीवर आणण्यासाठी मला पुन्हा संसदेत जायचे आहे. शेतकऱ्यांचे दोन कायदे प्रलंबित आहेत. ते येणाऱ्या सरकारकडून कोणत्याही परिस्थिती मला मंजूर करून घ्यायचे आहेत.’ यावेळी सावकर मादनाईक, सचिन शिंदे, शैलेश आडके, सरपंच जालिंदर ठोमके, अजित चौगुले, वकिल मादनाईक, हिंदूराव घाटगे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT