Kolhapur Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात मोदी-शहा आले तरी फरक पडणार नाही; सतेज पाटलांचं खुलं आव्हान

‘खासदार बदला कोल्हापूर बदलेल’ हाच हट्ट कोल्हापूरकरांनी धरलेला आहे.

सकाळ डिजिटल टीम

'भाजपने (BJP) पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतला आहे, त्यामुळे तो दुसऱ्या कुणाला लागू होऊ शकत नाही.'

कोल्हापूर : ‘काँग्रेसला (Congress) टार्गेट करून नागरिकांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशपातळीवर फोडाफोडीचे पेटंट फक्त भाजपकडे आहे. भाजपने (BJP) पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतला आहे, त्यामुळे तो दुसऱ्या कुणाला लागू होऊ शकत नाही,’ अशी टीका आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली. आज येथे एका कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार पाटील म्हणाले, ‘विरोधी पक्षातील सर्वांचे माझ्यावर जास्त प्रेम आहे, त्यामुळे ते टीका करत असतील. मात्र, कोल्हापूरची अस्मिता शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) निमित्ताने दिल्लीला पाठवायची आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. खासदार बदला परिस्थिती बदलेल. ‘खासदार बदला कोल्हापूर बदलेल’ हाच हट्ट कोल्हापूरकरांनी धरलेला आहे. पाच वर्षात संजय मंडलिक काही करू शकले नाहीत म्हणून ते आता टीका करत आहेत. मंडलिकांनी २०१९ मध्ये ‘अजिंक्यतारा’ची भूमिका कोणती होती? हे ही जाहीर करावे. आम्ही पण कोल्हापूरचेच आहोत, हे विसरू नये.’

ते पुढे म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुण्यात ‘हू इज धंगेकर’ म्हणाले होते. त्याचा परिणाम पुढे पाहायला मिळाला. भाजपची बिहारमध्ये आणि दक्षिण भारतामध्ये काय अवस्था होणार आहे, ही आकडेवारी समोर आहे.’ ‘यातच चंद्रकांत पाटील यांचा राजकारणाचा अभ्यास जास्त आहे’, अशी मिश्‍कील टिपणीही त्यांनी केली.

मोदी, शहा आले तरी फरक पडणार नाही

सतेज पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा प्रचाराला आले तरी त्याचा परिणाम पाहायला मिळणार नाही. लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे नाते कायम झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT