Narayan Rane esakal
लोकसभा २०२४

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : 'महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी कामाला लागा'; मंत्री नारायण राणेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

महायुतीचे यश हे इथल्या लोकांचे प्रेम, आशीर्वाद व पाठिंबा यावरच अवलंबून आहे.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीच्या (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) पार्श्वभूमीवर महायुतीच्या माध्यमातून तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

सावंतवाडी : गेली ३४ वर्षे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करीत आहे. मी जो काही आहे, तो कोकणी जनतेमुळेच. त्यामुळे महायुतीचे यश हे इथल्या लोकांचे प्रेम, आशीर्वाद व पाठिंबा यावरच अवलंबून आहे, अशी माझी भावना आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) पार्श्वभूमीवर महायुतीच्या माध्यमातून तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर.

तसेच भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजपच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा ॲड. नीता सावंत, खरेदी-विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे, संदीप कुडतरकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, प्रियांका गावडे, निरवडे सरपंच सुहानी गावडे, माजी जिल्हा परिषद सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या निकिता जाधव, दादा परब, बाळा जाधव आदी उपस्थित होते.

प्रक्रिया उद्योगांतून आर्थिक उन्नती साधा

मंत्री राणे म्हणाले, ‘‘कुंभार समाजासह इतर बलुतेदारांच्या आर्थिक उन्नतीसाठी पीएम विश्वकर्मा योजना मोदींनी आणली आहे. माझ्या खात्याच्या माध्यमातूनच या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. आपला कोकण विभाग शेतीप्रधान आहे. शेतीबरोबरच आंबा, काजू, फणस, कोकम, करवंदे अशी विविध फळे व कोकणी मेवा येथे उपलब्ध आहे. पाऊस पडल्यानंतर ही सर्व फळे वाया जातात. त्यामुळे या फळांवर प्रक्रिया करून टिकाऊ उत्पादने तयार करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. तुमच्या प्रयत्नांना आमची साथ निश्चितच लाभेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT