Kolhapur Lok Sabha Eknath Shinde  esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : मुख्यमंत्र्यांची शिष्टाई फळाला येणार का? नाराजी दूर करण्यातच महायुतीची ताकद खर्च

महायुतीकडून कोल्हापुरातून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) तर हातकणंगलेतून खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी उशिरा का होईना जाहीर झाली.

सकाळ डिजिटल टीम

आज कुपेकर प्रचारात सक्रिय असले तरी चंदगड तालुक्यात अजून महायुती विस्कळीत असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर : उमेदवारांविषयीची नाराजी, भाजपच्या सहयोगी आमदारांनी लढण्याचा दिलेला इशारा, नाराजांची मनधरणी करण्यात खर्च होत असलेली ताकद या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिष्टाई फळाला येणार का, असा प्रश्‍न राजकीय क्षेत्राला पडला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार तर निश्‍चित झाले, त्यांना आघाडीतून विरोध नसल्याने प्रचारातही त्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार व त्यांच्या पाठीराखे नेत्यांवर नाराजांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ आली आहे.

महायुतीकडून कोल्हापुरातून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) तर हातकणंगलेतून खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी उशिरा का होईना जाहीर झाली. पण, हातकणंगलेत महायुतीतूनच माने यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. सध्या महायुतीसोबत असलेले माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर अजूनही सक्रिय दिसत नाहीत. इचलकरंजीचे भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी तर थेट लढण्याचा इशारा देताना मंगळवारी (ता. १६) अर्ज भरणार असल्याचे जाहीर करून महायुतीसमोरच आव्हान उभे केले आहे. प्रा. मंडलिक यांच्याविषयी सुरुवातीला गडहिंग्लजचे भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी उघड विरोध करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

आज कुपेकर प्रचारात सक्रिय असले तरी चंदगड तालुक्यात अजून महायुती विस्कळीत असल्याचे चित्र आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर काल (ता. १३) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारीबाबत गांभीर्याने घेतले आहे. त्यातून त्यांनी दोन्ही मतदारसंघांतील नेत्यांशी चर्चा करून आढावा घेतला. त्यात कोल्हापूरपेक्षा हातकणंगलेतून मोठी नाराजी त्यांच्या समोर आली. आवाडे यांनी शिंदे यांच्या भेटीनंतरही लढण्यावर ठाम असल्याचे जाहीर केल्याने हा पेच सोडवण्याचे शिंदे यांच्यासमोर आव्हान असेल.

काल दुपारी तीन वाजल्यांपासून पहाटे साडेपाच वाजेपर्यंत नेत्यांच्या भेटीगाठी शिंदे यांनी घेतल्या, त्यातून शिष्टाई होणार का? हे येत्या दोन-तीन दिवसांत पाहायला मिळाले. आज (ता. १५) पुन्हा मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात येत आहेत, त्यातही घडामोडींची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले. कोल्हापुरातून काँग्रेसतर्फे शाहू महाराज यांची पूर्वीच उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या प्रचाराची एकहाती धुरा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे.

शाहू महाराज यांच्यासह पाटील यांनी जिल्ह्यातील विविध नेते, संघटनांशी संपर्क साधून प्रचाराचे रान उठवले आहे. हातकणंगलेतून ‘महाविकास’कडून उशिरा जरी सत्यजित पाटील-सरूडकर यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी आघाडीतील अन्य पक्षांचा या दोन्ही उमेदवारांवर आक्षेप नसल्याने त्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. सरूडकर यांच्या उमेदवारीने हातकणंगलेत रंगत वाढली असताना महायुतीसमोर ही जागा राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

आवाडे उद्या येणार का नाही?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या महायुतीच्या दोन्हीही उमेदवारांचे अर्ज शक्‍तिप्रदर्शनाने दाखल होणार आहेत. त्यासाठी आवाडे हेही उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तथापि आजच झालेल्या आवाडे यांच्या ताराराणी आघाडीच्या बैठकीत त्यांनी लढावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे उद्या (ता. १६) जाहीर उमदेवारांचे अर्ज भरायला आवाडे येणार की नाही, यावर त्यांची भूमिका स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: विदर्भाने इतिहास घडवला! थरारक फायनल जिंकून पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

तुम्ही सत्तेत तर याल पण...; भाजपवर जहरी टीका करत कपिल सिब्बल यांचा अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना मोठा संदेश, काय म्हणाले?

IND vs NZ, ODI: न्यूझीलंडविरुद्ध मालिका तर गमावली, आता विराट कोहली-रोहित शर्मा भारतीय संघाकडून पुन्हा कधी खेळणार?

Black Color Psychology : ज्यांना काळा रंग आवडत नाही त्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? स्वभाव तर असा असतो की आयुष्यभर...

SCROLL FOR NEXT