Kolhapur Lok Sabha Chetan Narake esakal
लोकसभा २०२४

'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही'; मुख्यमंत्र्यांचा फोन अन् लोकसभा निवडणुकीतून चेतन नरकेंची माघार

कोणत्याही पक्षाच्या पाठबळाशिवाय लोकसभा निवडणूक (Kolhapur Lok Sabha) लढवणे अवघड असते.

सकाळ डिजिटल टीम

'लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मात्र, या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्ष किंवा उमेदवाराला अजून समर्थन दिलेले नाही.'

कोल्हापूर : ‘कोणत्याही पक्षाच्या पाठबळाशिवाय लोकसभा निवडणूक (Kolhapur Lok Sabha) लढवणे अवघड असते. सांगलीतील लोकसभेची जागा काँग्रेसला (Congress) जाईल आणि कोल्हापूरची जागा शिवसेनेला मिळेल व आपल्याला संधी मिळेल या आशेवर होतो. मात्र, हे शक्य झाले नाही, त्यामुळे लोकसभेसाठी भरलेला निवडणुकीचा अर्ज मागे घेत असल्याची माहिती ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके (Chetan Narake​) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही माघार नव्हे तर नवी सुरूवात असल्याचे सांगतानाच त्यांनी कवी सुरेश भट (Suresh Bhat) यांची ‘विझलो जरी मी, हा माझा अंत नाही’ ही कविताच वाचून दाखवली. दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही फोन सकाळी आला होता. याबाबत सर्व कार्यकर्त्यांना घेऊन निर्णय घेतला जाईल. कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत विचार केला जाईल, असे नरके यांनी सांगितले.

नरके म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मात्र, या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्ष किंवा उमेदवाराला अजून समर्थन दिलेले नाही. युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी चेतन युवा सेतू संस्थेची स्थापना केली जाणार आहे. थायलंडसह अनेक देशांसोबत सामंजस्य कराराच्या माध्यमातून फौंड्रीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

कोल्हापुरात मोठ्या संधी असल्याचे ठळकपणे जाणवले. मात्र, राजकीय उदासीनता, प्रबोधन आणि अभ्यासाची कमतरता, योग्य मार्गदर्शन आणि पाठपुरावा नसल्यानेच येथे औद्योगिक, पर्यावरणीय, रोजगार आणि सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT