Kolhapur Lok Sabha Dhananjay Mahadik
Kolhapur Lok Sabha Dhananjay Mahadik esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : 'देशात रामराज्य येण्यासाठी संजय मंडलिकांना साथ द्या'; महाडिकांचं मतदारांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापुरात ‘मान गादीला आणि मत मोदींना’ असा जनप्रवाह तयार झाला आहे.

कसबा तारळे : खासदार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्वच घटक प्रचारात सक्रिय झाले आहेत. काहीजण शंभर वर्षांचा वारसा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत, तर आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन लढत आहोत. काही नेते जिल्ह्याचा विकास आम्हीच केला असा कांगावा करीत आहेत. त्यांना फक्त दुसऱ्यांना डॅमेज करण्यात रस आहे. परंतु, आम्ही मात्र विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहोत. त्यामुळे भावनिकतेपेक्षा विकासाला साथ देण्यासाठी व देशात रामराज्य येण्यासाठी मंडलिक यांना साथ द्या, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले.

महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या प्रचारार्थ कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. आजच्या दौऱ्यात कसबा वाळवेसह तुरंबे, अर्जुनवाडा, ठिपकुर्ली, पालकरवाडी येथे प्रचार बैठका झाल्या.

मंडलिक म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जनहिताच्या कल्याणकारी योजना राबविल्याने पुन्हा मोदी सरकार येणार आहे. त्यामुळे कोल्हापुरात ‘मान गादीला आणि मत मोदींना’ असा जनप्रवाह तयार झाला आहे. काँग्रेस सरकारला ६७ वर्षे सत्ता दिली. त्यांनी फक्त घोटाळे करण्यातच सत्तेचा वापर केला. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूरची स्वाभिमानी जनता साथ देईल.’

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘जिल्ह्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी मिळाला. शिवाय लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी काळम्मावाडी धरणाचे पाणी देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलविले. त्यांच्याच विचाराचा आणि विकासाचा वारसा संजय मंडलिक चालवत आहेत. आतापर्यंत राधानगरी, भुदरगड तालुक्यात शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविणारे अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील जनता मंडलिक यांना मताधिक्य देतील.’

यावेळी ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य भूषण पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, नंदकुमार सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते शामराव भावके, भाजपचे संभाजी आरडे, ठिकपुर्लीचे सरपंच प्रल्हाद पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रणजीत पाटील, चांदेकरवाडीचे सरपंच हिंदुराव खोत, शेळेवाडीचे सरपंच विकास पाटील, सरपंच वनिता पाटील, सरपंच दयानंद कांबळे,‘भोगावती’चे माजी संचालक विश्वास पाटील, बाजार समितीचे माजी संचालक विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT