Kolhapur Hatkanangale Lok Sabha
Kolhapur Hatkanangale Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूरसाठी 42, तर हातकणंगलेसाठी 55 अर्ज; आज छाननी, सोमवारपर्यंत माघारीची मुदत

सकाळ डिजिटल टीम

हातकणंगले मतदारसंघातील (Hatkanangale Lok Sabha) अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल करण्यात आले.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha) २८ उमेदवारांनी ४२, तर हातकणंगलेमधून ३६ उमेदवारांनी ५५ अर्ज भरले. शुक्रवारी शेवटच्या दिवशी कोल्हापूरमधून १३ जणांचे १४, तर हातकणंगलेमधून १६ जणांनी २२ अर्ज भरले. आज, शनिवारी (ता. २०) अर्जांची छाननी असून, माघारीची अंतिम मुदत सोमवार (ता. २२) पर्यंत आहे.

कोल्हापूर मतदारसंघातील अर्ज शुक्रवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दाखल करण्यात आले. यामध्ये मालोजीराजे छत्रपती (अपक्ष), बाजीराव नानासाहेब खाडे (अपक्ष), अरविंद भिवा माने (भारतीय राष्ट्रीय दल) यांचा पक्षाकडून एक व अपक्ष एक अर्ज, संजय भिकाजी मागाडे (बहुजन समाज पार्टी), मुश्ताक अजीज मुल्ला (अपक्ष), माधुरी राजू जाधव (अपक्ष), ॲड. यश सुहास हेडगे-पाटील (अपक्ष), कृष्णाबाई दीपक चौगले (अपक्ष), सुभाष वैजू देसाई (अपक्ष), इरफान आबुतालिब चांद (अपक्ष), राजेंद्र बाळासो कोळी (अपक्ष), मंगेश जयसिंग पाटील (अपक्ष), कुदरतुल्ला आदम लतीफ (अपक्ष) यांचा समावेश आहे.

हातकणंगले मतदारसंघातील (Hatkanangale Lok Sabha) अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल करण्यात आले. यामध्ये राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष), महम्मद मुबारक दरवेशी (अपक्ष), रवींद्र तुकाराम कांबळे (बहुजन समाज पार्टी) यांचे दोन अर्ज, संतोष केरबा खोत (कामगार किसान पार्टी), सत्यजित बाळासो पाटील (अपक्ष), अरविंद भिवा माने (अपक्ष) यांचे दोन अर्ज, राजेंद्र भीमराव माने (अपक्ष), धैर्यशील संभाजी माने (अपक्ष), अस्लम ऐनोद्दिन मुल्ला (अपक्ष), लक्ष्मण शिवाजी तांदळे (अपक्ष).

तसेच विश्वास आनंदा कांबळे (अपक्ष), वेदांतिका धैर्यशील माने (अपक्ष), परशुराम तमन्ना माने (अपक्ष), अस्मिता सर्जेराव देशमुख (अपक्ष), शरद बाबूराव पाटील (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), जावेद सिकंदर मुजावर (अपक्ष), सुनील विलास अपराध (अपक्ष), आनंदराव वसंतराव सरनाईक (अपक्ष), दिनकरराव तुळशीदास चव्हाण (अपक्ष), श्रीमती गोविंदा डवरी (अपक्ष) यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT