Pune Loksabha Result sakal
लोकसभा २०२४

Pune Loksabha Result : जागांचा मुद्दा ठरणार कळीचा ; विधानसभा, महापालिका निवडणुकीसाठी रस्सीखेच

लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता आगामी निवडणुका महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशा होणार, की सध्या असलेले मित्र एकमेकांविरोधात उभे ठाकणार, हे येता काळच ठरवेल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता आगामी निवडणुका महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशा होणार, की सध्या असलेले मित्र एकमेकांविरोधात उभे ठाकणार, हे येता काळच ठरवेल. युती आणि आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय झाला, तर जागावाटप हा कळीचा मुद्दा राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला पुण्यात हॅटट्रिक साधण्यात यश आले. परंतु २०१९ मधील निवडणुकीच्या तुलनेत पक्षांच्या मतांचा टक्का घसरला. दुसरीकडे यश मिळाले नसले तरी काँग्रेसच्या मतांचा टक्का वाढला, ही पक्षाच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. भाजपसाठी ही जशी धोक्याची घंटा आहे, तशी ती काँग्रेससाठी सकारात्मक बाब ठरली आहे. गेल्या दोन वर्षांत राज्याच्या राजकारणात झालेली उलथापालथ, युती आणि आघाडीतील बदलले मित्रपक्ष आणि लोकसभा निवडणूक निकाल, या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात विधानसभा आणि महापालिका निवडणुका होत असून, त्या सर्वार्थाने वेगळ्या असणार आहेत.

पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्याचे राजकीय बलाबल पाहता चार जागा भाजपकडे, तर दोन जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. अजित पवार भाजपसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेससोबत आहे.

लोकसभेच्या निकालावरून सध्या तरी विधानसभा निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता अधिक आहे. तसे झाल्यास जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच होणार हे स्पष्ट आहे. हीच काहीशी परिस्थिती महाविकास आघाडीतही असणार आहे. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्ये ती तीव्र स्वरूपाची असेल, असे चित्र सध्या तरी आहे. विशेषतः हडपसर, वडगावशेरी व कसबा या जागांवरून महायुतीत वाद रंगण्याची चिन्हे अधिक आहेत. तर महाविकास आघाडीत हाच वाद कसब्याबरोबरच पर्वतीच्या जागेवरून काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर युती आणि आघाडी होणार का, यावरून आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे.

रिपब्लिकन पक्षाची भूमिका?

प्रभागरचनेवर महापालिकेचे सत्तेचे गणित असल्यामुळे विधानसभेपूर्वी या निवडणूका होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्यातील जागावाटप हा मुख्य मुद्दा असणार आहे. गेल्यावेळेस आठवले गटाचे उमेदवार भाजपचे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष काय भूमिका घेणार? हादेखील औत्सुक्याचा विषय राहणार आहे.

काँग्रेस झुकते माप देणार का?

महाविकास आघाडीत काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना काँग्रेस झुकते माप देणार का, यावर आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. महापालिका निवडणुकीतही आघाडी टिकली, तर कोणाला किती जागा मिळणार हा चर्चेचा विषय असेल. युती अथवा आघाडी झाली नाही, तर सर्वच प्रमुख पक्ष एकमेकांसमोर ठाकणार की युती आणि आघाडीतील मित्रपक्ष बदलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT