Loksabha Elections Vidarbha sakal
लोकसभा २०२४

Loksabha Elections Vidarbha : विदर्भात महाविकास आघाडीची मुसंडी!

गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा गड मानल्या गेलेल्या विदर्भात यंदा लोकसभेसाठी दहापैकी सात जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.

संदीप भारंबे

गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा गड मानल्या गेलेल्या विदर्भात यंदा लोकसभेसाठी दहापैकी सात जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या वेळी भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन असे महायुतीचे आठ, काँग्रेसचा एक तर एक अपक्ष अशी स्थिती होती. यावेळी भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेनेचा एक खासदार विजयी झाला आहे. उर्वरित जागांवर महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. यंदा वर्ध्यातील अमर काळे यांच्यारूपाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने खाते उघडले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हॅट्‌ट्रिक साधली असली तरी त्यांचे मताधिक्य कमी झाले. भाजपच्या तीन विद्यमान खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रा‍तील भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाला हा जबर धक्का मानला जात आहे. त्या उलट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या डोक्यावर यशाचा तुरा खोवला गेला आहे. सुधीर मुनगंटीवार, नवनीत राणा, रामदास तडस हे दिग्गज पराभूत झाले.

विदर्भात महायुतीच्या विरोधात वातावरण दिसत होते. वाढलेली महागाई व शेतीमालाला भाव नसणे हा ग्रामीण भागात मोठा मुद्दा होता. त्या शिवाय संविधान बदलण्यासाठी ‘चारशे पार’ असा प्रचार झाला, परिणामी मतांचे ध्रुवीकरण झाले. पक्ष फुटीचा प्रकार लोकांना आवडला नाही. याउलट उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुस्लिम समाजाचीही मते मिळाली. एरवी उमेदवार बदलणाऱ्या भाजपने जुनेच उमेदवार दिले. शिवसेनेसाठी रामटेकचे उमेदवार आठ दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून आयात करण्यात आले, तर यवतमाळमध्ये ऐनवेळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. हे सर्व पराभूत झाले.

वंचित’लाही फटका

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव दिसला नाही. अकोल्यातून पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला. त्यांना गेल्यावेळीपेक्षाही कमी मते मिळाली. अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांनाही फारशी मते मिळाली नाहीत. वंचितच्या इतर उमेदवारांनाही समाधानकारक मते मिळाली नाहीत.

मोदींच्या सभा निष्फळ

विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर, कन्हान, वरुड, यवतमाळ येथे चार सभा झाल्या होत्या. मात्र सभा झालेल्या मतदारसंघांतील उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT