where to vote difference between voter app and receipt lok sabha election
where to vote difference between voter app and receipt lok sabha election Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Poll 2024 : मतदान नेमके कुठे करायचे? व्होटर ॲप व पावतीवर वेगवेगळे स्थळ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ग्राम पंचायतीने वाटप केलेल्या पावत्या आणि निवडणूक आयोगाची वेबसाइट व ॲपवर मतदानाचे वेगवेगळे स्थळ दर्शविण्यात आले असल्याने नेमके मतदान कुठे करायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

रामटेक लोकसभा मतदासंघातील बेसा-बेलतरोडी येथील मतदार यामुळे संभ्रमात आहेत. ग्राम पंचायतीच्यावतीने वाटप करण्यात आलेल्या मतदानाच्या पावत्यांमध्ये रेवतीनगर येथील न्यू ईरा कॉन्वेंट असे मतदान केंद्र नमूद केले आहे.

मात्र वेबसाईट व होटर ॲपवर स्वामी समर्थ मंदिराजवळील जिल्हा परिषदेचे अंगणवाडी केंद्र असे दर्शविण्यात आले आहे. काहींच्या नावापुढे बालपांडे कॉलेज असेही दाखवल्या जात आहे. यामुळे कुठे मतदान मतदान करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या मतदान वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेगवेगळ्या मोहीम राबवल्या जात आहेत. जनजागृती केली जात आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे याकरिता विविध उपक्रम राबविल्या जात आहेत.

शहरासह ग्रामीण भागात प्रशासनाच्या वतीने गेल्या महिनाभरापासून मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न सुरू होते. लोकशाहीचे रक्षण आणि संवर्धनासाठी सर्वांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, हे नागरिकांना पटवून देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयांचे सहकार्य घेण्यात आले.

सर्वाधिक युवा मतदारांची नोंदणी केल्याने नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचा निवडणूक आयोगाने पुरस्कार दिला आहे. युवा मतदार तंत्रस्नेही आहेत. ते व्होटर ॲपचा सर्वाधिक वापर करतात. यावेळी मतदानाचा आकडा ७५टक्के जावा, असे प्रयत्न केले जात आहे. मात्र,मतदान केंद्रांच्या घोळामुळे अनेकांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेसा-बेलतरोडीतील मतदारांनी हा घोळ निदर्शनास आणून दिला.

एका हॉलमध्ये चार बूथ

उत्तर नागपूरमधील पीडब्ल्यूएस कॉलेजच्या एका हॉलमध्ये चार बूथ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे हे उल्लंघन मानल्या जाते. याशिवाय गोपनीयतेचा भंगही होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT