Supriya Sule
Supriya Sule eSakal
लोकसभा २०२४

Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रारंभाला पवार कुटुंबीय; युगेंद्र पवारांनी पहिल्यांदाच आजोबांसमोर केलं भाषण

सकाळ वृत्तसेवा

Lok Sabha 2024 : बारामतीच्या कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ १९६७ पासून श्री क्षेत्र कन्हेरी येथील मारुती मंदिरात श्रीफळ वाढवून पवार कुटुंबीयांकडून केला जातो. कन्हेरीतून आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला. या वेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. सर्व पवार कुटुंबीय या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते.

मात्र व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खुर्चीसमोर बसलेले त्यांचे नातू आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या वेळी राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, रणजित पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार, शुभांगी पवार आदी उपस्थित होते. सर्वांनी समोर बसून सभा ऐकली.

या वेळी प्रथमच युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर भाषण केले. ते म्हणाले, ‘‘मी प्रथमच पवार साहेब व माझे वडील श्रीनिवास पवार, सुप्रिया सुळे व सर्व कुटुंबीयांसमोर बोलतोय. त्यामुळे माझी मनस्थिती समजून घ्या. काही चुकले तर मी आत्ताच दिलगिरी व्यक्त करतो,’’ असे सांगत यानंतर अतिशय संयतपणे कोणतीही टीकाटिपणी न करता युगेंद्र यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही आतापर्यंत आम्हाला खूप प्रेम दिले. येथून पुढेदेखील आम्हाला प्रेम द्या. बारामतीमध्ये शरद पवार साहेबांनी विविध संस्था आणल्या. मनमोहन सिंग सरकारमध्ये कृषी खाते आवर्जून मागून घेतले. त्या वेळी त्यांनी ७२ हजार कोटींची शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. दिल्लीमध्ये आपले विषय मांडणारा खासदार आपल्याला पाठवायचा आहे. फक्त तिथे जाऊन बसणारा, सांगेल ते काम करणारा खासदार नको आहे. जे देशात सुरू आहे, ते घातक आहे. त्यामुळे संसदेत आपला आवाज असणारा खासदार पाठवायचा आहे. तो आवाज फक्त आणि फक्त सुप्रियाताईच आहेत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT