Loksabha 2019

Loksabha 2019 : काँग्रेस म्हणजे 'कन्फ्यूजन'चे दुसरे नाव : पंतप्रधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काँग्रेस आता सर्वांत कमी जागा लढवित आहे. यापूर्वी 2014 मध्ये सर्वांत कमी जागा जिंकण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. तर आता सर्वांत कमी जागा लढविण्याचा आहे. त्यामुळे काँग्रेस आता 'कन्फ्यूजन'चे दुसरे नाव बनले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. 

वांद्रा-कुर्ला येथे आयोजित महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत आहेत. ते म्हणाले, माझ्या एका आवाहनानंतर अनेकांना गॅस अनुदान सोडले. मध्यमवर्गीयांच्या योगदानामुळे हे सर्व काही साध्य होऊ शकले आहे. तसेच 40 लाख नागरिकांनी रेल्वेचे अनुदान सोडले. 'आयुष्यमान भारत' ही योजना देशासाठी एक आधार ठरली आहे. मागील पाच वर्षांत आपण अनुभव घेतला असेल, की भ्रष्टाचाराची एक बातमीही तुम्ही वाचली नसेल.

तसेच 2014 नंतर गैरव्यवहार करणाऱ्या अनेकांना मी तुरुंगाजवळ नेले. आता 2019 मध्ये पुन्हा संधी द्या, त्यांना आतमध्ये टाकेन. याशिवाय 2014 च्या तुलनेने मध्यमवर्गीयांच्या खिशात आता अधिक पैसे शिल्लक राहत आहेत, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM VBRY: तुमच्या खात्यात १५,००० रुपये आले का? आज लाखो जणांना मिळणार थेट लाभ; आधी पात्रता तपासा...

Koyna Dam Security : राज्याला 2 हजार मेगावॉट वीज निर्मिती करणाऱ्या कोयना प्रकल्पाला धोका? दिल्लीहून 'आयबी'चे पथक थेट पोफळीत दाखल, तीन दिवस धरणाची होणार कसून पाहणी

Latest Marathi News Live Update : २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकणात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज

Satara Politics: उदयनराजेंचा शशिकांत शिंदेंना कानमंत्र, मतदान केंद्रावरील भेटीची साताऱ्यात दिवसभर चर्चा, कानात नेमकं काय सांगितलं?

Life-Saving Injection 9 Crore Case: अनिकाच्या उपचारांसाठी ९ कोटींच्या इंजेक्शनची गरज, हायकोर्टाने गुजरात सरकारवर ओढले ताशेरे; 'चिमुकली लाडकी बहीण नाही का?'

SCROLL FOR NEXT