ncp_congress
ncp_congress 
Loksabha 2019

Loksabah 2019 : कऱ्हाडला काँग्रेसच्या नेत्यांनी आळवला बंडाचा सूर

सचिन शिंदे

कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसले यांचा गट सातत्याने काँग्रेसच्या विरोधात काम करत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थासह डीपीडीला काँग्रेसविरोधी भूमिका घेत आहे. त्याचा विचार करूनच राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घ्यावा, असा दबाव गट निर्माण करून काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आज बंडाचा झेंडा फडकविला. निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कऱ्हाड दक्षिणेतील नेत्यांची एकत्रित बैठक झाली. त्यात बंडाचा सुर आळवल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर खासदार उदयनराजे यांच्यासाठी बांधणीला वेग आला आहे. आघाडी धर्म पाळण्यासाठी कऱ्हाडला जिल्हा काँग्रेस समितीची बैठकही झाली आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटला होता. त्यावेळी गटाचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाही सन्मान राखूनच आघाडी करण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर काही काळ वातावरण तापलेले होते. ती सगळी स्थिती लक्षात घेऊन खासदार उदयनराजे यांच्या गटाने त्यांची बांधणी सुरू केली. त्यांनी कऱ्हाड शहरासह तालुक्यातील नेत्यांसह महत्वाच्या गाठीभेटीचा सपाटा लावला. मात्र सन्मानाच्या मुद्दावरून पुन्हा एखदा वादाची ठिणगी पडली आहे.

खासदार गटाची मलकापूर निवडणुकीसह डीपीडीसीतील भूमिका काँग्रेस विरोधी होती. त्याशिवाय जिल्ह्यातील काही महत्वाच्या ठिकाणी खासदार गटासह राष्ट्रवादीचा गट काँग्रेसलाच अडविण्याचे धोरण आखतो आहे. त्या सगळ्या स्थितीचा आढावा घेऊन बंड करण्यासाठी किंवा पुढील वाटचालीतील काँग्रेसला सन्मानाची वागणूक मिळावी, या मुद्यावर कऱ्हाड तालुक्यातील काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांची महत्वाची बैठक वडगाव हवेली येथील एका फार्माहाऊसवर पार पडील आहे. त्यात प्रत्यक्षात आमदार चव्हाण यांना भेटून दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची मते सांगण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते बंडानाना उर्फ जयवंत जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, नरेंद्र पाटील, शिवाजीराव मोहिते, विद्यार्थी काँग्रेसचे नेते शिवराज मोरे, नितीन थोरात, वैभव थोरात, नामदेव पाटील, शंकरराव खबाले, गलांडे यांच्यासह अन्या काही नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. त्यात अत्यंत तीव्र शब्दात नेत्यांनी भुमिका मांडल्या. निधी कोमी आणला, किती आणला यासह खासदार गटाने दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस विरोधी काम, कऱ्हाड शहरासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थातून सातत्याने काँग्रेस विरोधी होणारे काम, राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका, जिल्हा नियोजन समितीत खासदार गटाने केलेली अडवणूक अशा सगळ्या गोष्टींवर विशेष चर्चा झाली. त्या सगळ्या गोष्टी भविष्यात टाळल्या पाहिजेत, यासाठी ठोस जाहीर भुमिका स्पष्ट करम्याचा आग्रह नेत्यांनी धरला. नेत्यांनी आळवलेल्या बंडाचा सुर त्या गटाचे नेते आमदार चव्हाम यांच्यापर्यंतचही पोचला आहे. त्याबाबत आज (शनिवारी) सकाळी थेट आमदार चव्हाण यांच्याशीच बैठक होणार आहे. त्या बैठकीत राष्ट्रवादीसह खासदार गटाची भविष्यातील भुमिका काय असणार आहे, त्याचा शब्द घेण्यात येणार आहे. 

अडवणूक थांबली पाहिजे 
काँग्रेसचे नेते आघाडी धर्म निश्चीत पाळणार आहेत. प्रचाराला कोणीही विरोध करण्याच्या मानसिकतेत नाहीत. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाचे स्थानिक नेते सातत्याने काँग्रेस विरोधी भूमिका घेत आहेत. ते थांबले पाहिजे, असा आग्रही धरला जाणार आहे. त्यामुले आमदार चव्हाण यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीकडे आता लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT