Loksabha 2019

LokSabha 2019 : कोणता झेंडा घेऊ हाती?; जालन्यात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

भास्कर बलखंडे

जालना - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधातील बंड मागे घेत असल्याची घोषणा केली. औरंगाबादमधील बैठकीत दोघांचे मनोमिलन झाल्याने ते आता लोकसभेला एकत्र सामोरे जातील; परंतु दोन वर्षांपासून आपापले झेंडे घेऊन संघर्षाला सामोरे जाणारे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. 

ऐन निवडणुकीच्या काळात नेमका कोणता झेंडा घेऊन लढायचे, याविषयीचाच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढल्याने भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे विलास औताडे यांच्यावर निर्णायक विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांची केंद्रीय मंडळात वर्णी लागली; परंतु ते तिथे फार काळ रमले नाहीत. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. त्यानंतर दानवेंनी मराठवाड्यासह राज्यात पक्षविस्ताराकडे लक्ष घातले. 

यादरम्यान, त्यांनी अनेकदा शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. यातूनच दानवे विरुद्ध खोतकर असा संघर्ष उभा राहिला. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षांत अनेकदा भाजप नेतृत्वावर वार केले. त्यामुळे हे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येण्याची शक्‍यता नसल्याचे अंदाज बांधले जात होते. यातूनच खोतकरांनी दानवेंविरुद्धचा संघर्ष तीव्र केला; परंतु लोकसभा निवडणुकीत युती झाल्यामुळे दोन्ही नेत्यांच्या अडचणी वाढल्या. मतभेद मिटविण्यासाठी त्यांच्यासमोर पर्याय राहिला नाही. यासाठी काही मंत्र्यांनीही शिष्टाई केली. मात्र, एकमेकांविरुद्ध टीका करीत राज्याचे लक्ष वेधणाऱ्या या नेत्यांच्या संघर्षामुळे मतदारसंघातील प्रश्नांकडेही दुर्लक्ष झाले. आता दोघांचे मनोमिलन झाले खरे; पण कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार का? नेमका कोणता झेंडा घेऊन पुढे निघायचे? असे प्रश्‍न कार्यकर्त्यांपुढे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT