ajit-pawar
ajit-pawar 
Loksabha 2019

Loksabha 2019 : मोदी सरकारला घरी बसवा - अजित पवार 

वृत्तसंस्था

खारघर - 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खोटी अश्वासने देवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या मोदी सरकारला येत्या निवडणुकीत जागा दाखविण्यासाठी उत्तरप्रदेशात खासदार मायावती, अखिलेश यादव आणि इतर पक्ष एकजूट होवून लढा देत आहे. तेव्हा मोदी सरकारला धडा शिकविण्याची ही संधी सोडू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खारघर येथे केले. 

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नवाब मलिक, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, पनवेल पालिकेचे विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक सतीश पाटील, हरेश केणी, गुरुनाथ गायकर, अजीज पटेल, काँग्रेसचे सुदाम पाटील, बळी नेटके आदी मान्यवर उपस्थित होते.

उत्तर भारतीय खारघर समाजच्या वतीने होली मिलन समारोह निमित्त खारघर मध्ये कार्यक्रम आयोजित केले होते. या प्रसंगी पवार बोलत होते. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जनतेला खोटी आश्वासने देवुन सत्तेवर आले. येत्या वर्षभरात उत्तर प्रदेशात झालेल्या पोट निवडणुकीत मोदी हे बोल बचन करतात. हे तेथील जनतेला पटल्याने मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला पराजित केले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेच देश चालवित असल्याचे जनतेला कळले आहे. आघाडी सरकारच्या काळात सिलेंडर 350 मिळत असे आज त्यासाठी 850 रुपये मोजावे लागत आहे. दोन कोटी युवकांना रोजगार देवू असे सांगितले. मात्र नोटबंदी करून छोटेमोठे उद्योग धंदे देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. महाराष्ट्र युती सरकारने कोणतेही विकासकामे केली नाही. राष्ट्रवादी पक्षाने या वर्षी युवा वर्गाला संसदमध्ये पाठविण्यासाठी तरुण उमेदवार उभे केले आहे. जातीयवादी आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजप युतीला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी खारघर मधील उत्तर प्रदेशीय समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT