Modi Shah
Modi Shah 
Loksabha 2019

LokSabha 2019 : वाराणसीतून नरेंद्र मोदी, तर गांधीनगर मधून अमित शहांना उमेदवारी 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गांधीनगर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लढणार आहेत. परंतु, भाजपने जाहीर केलेल्या 184 उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. अडवाणी यांच्या मतदारसंघातून अमित शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लालकृष्ण अडवानी यांचे भाजपच्या उभारणीतील योगदान मोठे आहे. तरिही त्यांचे नाव कापल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वर्चस्व असणाऱ्या अमेठी मतदारसंघातून पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उभ्या राहणार आहेत.  2014 च्या निवडणूकीत इराणी यांनी मोठी मजल मारली होती. परंतु, त्या निवडूण येऊ शकल्या नाहीत.

भाजपा प्रमुख उमेदवार व त्यांचे मतदारसंघ
राजनाथ सिंह - लखनौ
व्ही के सिंह - गाझियाबाद
हेमा मालिनी - मथुरा
साक्षी महाराज - उन्नाव मधून निवडणूक लढविणार आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट काल्याने काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला भाजपवर टिका केली आहे.   
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना सरुवातील मार्गदर्शक मंडळात पाठविण्यात आले आणि आता तर त्यांची लोकसभेची उमेदवारीही नाकारण्यात आली आहे. नरेंद्र मोदी जिथे ज्येष्ठांचा आदर करु शकत नाहीत तिथे जनतेच्या विश्वासाचा आदर कसे करणार? भाजपा भगाओ, देश बचावो अशी टिका रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विटरवरून केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT