Congress_Logo
Congress_Logo 
Loksabha 2019

Loksabha 2019 : काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी गैरहजर 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा  - माढ्याच्या उमेदवारीवरून रणकंदन झाल्यानंतर मोहिते-पाटील यांचा भाजप प्रवेश झाला. त्यावेळी इथल्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या निर्णयाचे समर्थन केले. आज मंगळवेढा येथे झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दांडी माल्यामुळे शिंदे यांना राष्ट्रवादीची मदत होणार की नाही यावर साशंकता व्यक्त केली जात आहे. जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी केलेल्या आवाहनाला कितपत यश येते याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सोलापूर लोकसभेचा उमेदवारी निश्चित करण्यापूर्वी गेल्या सहा महिन्यापासून माजी मंत्री शिंदे हे मतदारांशी संपर्कात असून, शिवाय प्रमुख नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदारसंघात त्यांचे कार्यकर्त्यांसमवेत मिळावे होत आहेत. आज मंगळवेढा येथे झालेल्या मेळाव्याचे आयोजनात भालके यांनी काँग्रेस यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात यश मिळवले ग्रामीण भागातील नागरिकाची मोठी उपस्थिती लक्षवेधक होती. तरी या मेळाव्याकडे राष्ट्रवादीच्या शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष हे  नाकारता येणार नाही. या मेळाव्यामध्ये बोलताना जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी शिंदे लोक लोकसभेत नसल्याने जिल्ह्याला काय परिणाम झाले. हे सांगून भविष्यामध्ये शिंदे लोकसभेत जाणे आवश्यक असल्याचे सांगतीले परंतु, राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी गैरहजर असल्याबाबत यांनी कोणतीही भूमिका याबाबत स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे लोकसभेसाठी शिंदेला मताधिक्य देण्यात राष्ट्रवादीची अडसरण ठरण्याचे वृत्त यापूर्वी सकाळी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे हे वृत्त खरे ठरते की काय याविषयी शहरांमध्ये चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेशाबाबत अकलूज येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ते बैठकीत मंगळवेढ्याच्या राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी हजेरी लावली. यावेळी तुमच्या सोबत तुम्ही तिथे आम्ही तुमच्या सोबत अशी भूमिका त्यावेळी ते म्हणाले होते. आजची गैरहजेरी हजेरी स्पष्ट करणारी होती. भारत बेदरे यांनी देखील यापूर्वीचा काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करूनही राष्ट्रवादीकडे दुर्लक्ष देखील नमूद केले होते. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना केले. सध्या शिंदेची मंदार भालकेवर अवलंबून आहे. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राहुल शहा यांनी आपण आपल्या कामासाठी बाहेर गावी आल्याचे सांगितले.

लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त मदत करायचे उलट काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य होत नाही आणि आजच्या बैठकीत या संदर्भात राष्ट्रवादीच्या पदाधिकाय्राना विश्वासात न घेतल्याने नसल्यामुळे आपण या बैठकीला गेलो नाही.
- अजित जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT