dehu
dehu 
Loksabha 2019

Loksabha 2019 : श्रीरंग बारणे-पार्थ पवार आले एकत्र!

सकाळवृत्तसेवा

देहू : मावळचे विद्यमान खासदार आणि आगामी लोकसभा निवडणुकीचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार हे शुक्रवारी (ता. 22) समोरासमोर आले. निमित्त होते जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन बीजोत्सव सोहळ्याचे. तुकोबांचे दर्शन घेण्यासाठी दोघेही मंदिरात एकमेकांच्या समोरा-समोर आले आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

नुकतीच काही वेळापूर्वी शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पुन्हा एकदा श्रीरंग बारणे मावळमधून खासदारकीसाठी उभे राहतील. तर बऱ्याचे चर्चेअंती राष्ट्रवादीकडून मावळ मतदारसंघात पार्थ पवार हे उभे राहणार आहेत. त्यामुळे दोन उमेदवारांचे निवडणुकीपूर्वीचे हे दुर्मिळ चित्र पहिल्यांदाच बघायला मिळाले आहे. तसेच बारणे यांनी पालखीची पूजा केली. दोघांनीही एकाद वेळी तुकोबांच्या चरणी एकाच वेळेस जाणे म्हणजे योगायोगच समजावा. 

संत तुकाराम महाराजांचा 371 बीजसोहळा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार देहूच्या इंद्रायणी नदीच्या तीरावर पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दोन लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT