Loksabha 2019

Loksabha 2019 : राहुल दुसऱ्या मतदारसंघातूनही?

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : अनेक राजकीय नेत्यांनी पूर्वी एकपेक्षा जास्त मतदारसंघांतून निवडणुका लढविल्या आहेत, असे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सांगितले. मात्र या संदर्भात कॉंग्रेस लवकरच निर्णय करेल, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे अमेठीव्यतिरिक्त अन्य एखाद्या मतदारसंघातून उभे राहण्याची चर्चा आहे. त्यांच्या या विधानाला त्यामुळे महत्त्व दिले जात आहे. राहुल यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांनीही निवडणूक लढवावी असा कॉंग्रेसजनांचा आग्रह आहे. त्या संदर्भात विचारता, "निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय त्याच घेतील,' असे उत्तर राहुल यांनी सांगितले. कार्यकर्त्यांबरोबर आज संवाद साधताना "मी वाराणसीतून निवडणूक लढवू का,' असा प्रश्‍न प्रियांका यांनी केल्यामुळे त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा मतदारसंघ असून, आगामी निवडणूकही ते येथूनच लढविणार आहेत.

अमेठा ही माझी कर्मभूमी आहे आणि राहील, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांनी केरळ किंवा कर्नाटकमधून निवडणूक लढवावी असा त्या राज्यांतील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्या संदर्भात विचारता, राहुल यांनी एकापेक्षा जास्त मतदारसंघांतून पूर्वी अनेकांनी निवडणूक लढविल्याचे सांगितले. या संदर्भात त्यांनी मोदी यांचे उदाहरण दिले. निवडणूक लढविण्याचा आग्रह करणाऱ्या केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभारही मानले. अन्य मतदारसंघांतून रिंगणात उतरण्याबाबत कॉंग्रेस लवकरच निर्णय करेल, असे राहुल म्हणाले. 2014 च्या निवडणुकीत राहुल यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. यंदाही स्मृती पुन्हा अमेठीतून उभ्या आहेत. 

चुरशीची लढत देण्यासाठी कॉंग्रेसतर्फे ज्येष्ठांना उमेदवारी देणार काय, या प्रश्‍नावर राहुल म्हणाले, ""उमेदवारनिश्‍चितीची पक्षाची एक पद्धत आहे आणि त्यासाठी बरीच प्रक्रिया असते. पक्षाला तरुण आणि ज्येष्ठ यांची सारखीच गरज आहे. आमच्याकडे ज्येष्ठ नेते रिंगणात आहेत आणि प्रथमच निवडणूक लढविणारे तरुण चेहरेही आहेत.'' 

आजीपासून परंपरा 

गांधी घराण्याला दक्षिणेतून निवडणूक लढविणे नवे नाही. राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी कर्नाटकातील चिकमंगळूरमधून, तर मातुःश्री सोनिया गांधी यांनी बळ्ळारीतून लोकसभा निवडणूक लढविली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT