Loksabha 2019

Loksabha 2019 : पुण्यात भाजप-शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात होणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. युती झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाची चाचपणी होणार आहे. 

बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी (ता. 18) सकाळी 11 वाजता हा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी पश्‍चिम महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

मेळाव्याच्या तयारीसाठी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार मेधा कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे शहरप्रमुख, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी बालगंधर्व रंगमंदिराची पाहणी केली. मेळाव्याला येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची व्यवस्था, निवडणूक आयोगाची परवानगी, व्यासपीठावर दोन्ही पक्षांचे कोणते पदाधिकारी असणार, मेळाव्याला कोण येणे अपेक्षित आहे, व्यासपीठाचे स्वरूप काय असावे, त्याची सजावट कशी असावी, यासह इतर नियोजनावर चर्चा झाली. मेळाव्यासाठी शिवसेनेला जबाबदारीचे समान वाटप करण्यावर भर देण्यात आला. 

शिवसेनेकडून भाजपवर होणाऱ्या प्रखर टीकेमुळे दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यात परत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला पुण्यातील किती आणि कोणते मतदारसंघ येणार, यावरून शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे. असे असताना लोकसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेला सोबत घेऊन काम करावे लागणार असल्याने यानिमित्ताने दोन्ही पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाची चाचपणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT