Rahul Gandhi
Rahul Gandhi 
Loksabha 2019

Loksabha 2019 : अमेठीसह 'या' मतदारसंघातून लढणार राहुल गांधी? 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी सोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगली आहे. कॉंग्रेसने थेट दुजोरा देण्याचे टाळले असले, तरी केरळमधून आलेल्या याबाबतच्या प्रस्तावावर राहुल सकारात्मक असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. अर्थात, अमेठी हीच त्यांची कर्मभूमी असल्याची पुस्तीही जोडली आहे. 

राहुल गांधींची अमेठीतून उमेदवारी आधीच जाहीर झाली आहे. मात्र दक्षिणेतूनही ते लढू शकतील अशीही चर्चा आहे. त्यासाठी कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमधील मतदारसंघांची नावे पुढे आल्याचेही सांगितले जात होते. मात्र आता या मालिकेमध्ये केरळमधील वायनाड मतदारसंघाचे नाव अग्रक्रमाने पुढे आले आहे. कॉंग्रेस संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, केरळचे प्रदेशाध्यक्ष रमेश चेन्निथला त्याचप्रमाणे केंद्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस ओमान चंडी यांनीही राहुल गांधींकडे याबाबतचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले. 

कॉंग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी वायनाडमधून राहुल यांच्या संभाव्य उमेदवारीबद्दल सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधींनी केरळमधून लढण्याबद्दल प्रदेश कॉंग्रेसने मागणी केली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रेमाचा आदर आहे. यावर सकारात्मक निर्णय होईल. 

अमेठीने पळवून लावल्याने ठिकठिकाणांहून बोलावणे येत असल्याचे सोंग रचले जात आहे. 
- स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT